Tarun Bharat

तुरमुरीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

वार्ताहर /उचगाव

तुरमुरी येथील युवा मंच, तुरमुरी यांच्या वतीने खास युवकांसाठी रामराज्य ट्रॉफी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धांचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. तुरमुरी येथील श्रीकृष्ण व श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या क्रिकेट स्पर्धांचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागराज जाधव हे होते. यावेळी गणेश फोटो पूजन नागराज जाधव, हनुमान फोटो पूजन अशोक चौगुले, सरस्वती फोटो पूजन प्रकाश चलवेटकर, शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन शटूप्पा गुंजीकर, संभाजी महाराजांच्या फोटोचे पूजन यल. आर. मासेकर, जिजाऊ साहेबांच्या फोटोचे पूजन चेतन पाटील, डॉ. आंबेडकर प्रतिमेचे पूजन लक्ष्मण लाळगे, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन महेंद्र जाधव तसेच दीप प्रज्वलन चांगदेव बेळगावकर, सुरेश राजुकर, मारुती खांडेकर, परशुराम अष्टेकर, गोपाळ डोणकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तर या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मैदानाचे उद्घाटन माजी महापौर शिवाजी सुंटकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नाणेफेक आंबेवाडी ग्रामपंचायतचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट किटचे उद्घाटन सुरेश खांडेकर, मारुती भक्ती कर, यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

मासळी खरेदीला खवय्यांची पसंती

Patil_p

शहर परिसरात भाऊबीज साजरी

Patil_p

काकती श्री सिद्धेश्वर यात्रेला परवानगी द्या

Amit Kulkarni

बिजगर्णी गावात भरविणार कुस्ती आखाडा

Amit Kulkarni

राज्य सरकारविरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे आंदोलन

Omkar B

जांबोटी हायस्कूलमध्ये संस्कृतवर्गाचे उद्घाटन

Amit Kulkarni