Tarun Bharat

वाहन स्क्रॅप सुविधेचे हरियाणामध्ये उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

नूंह

Advertisements

 हरियाणा या राज्यातील नूंह जिल्हय़ामध्ये एक वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. वाहन स्क्रॅप पॉलिसी लागू करुन सरकार वातावरणातील प्रदूषण कमी करणे व या क्षेत्रातील उत्पादन क्षमतेमध्ये वृद्धी करण्यावर आगामी काळात भर देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

वाहन क्षेत्र देशामध्ये कोटय़वधी लोकांना रोजगार उपलब्ध करुन देत आहे. यासोबतच वर्ष 2024 च्या अंतिम कालावधीपर्यंत नवीन वाहन पॉलिसीमधून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे पॉलिसी राबवताना  पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाणार आहे.

या पॉलिसीचा होणार अधिक लाभ

सदरच्या स्क्रॅप पॉलिसीचा फायदा आगामी काळात होणार असून यामध्ये तांबे, पोलाद, ऍल्युमिनिअम, रबर आणि प्लास्टीक हे घटक सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होईल.

Related Stories

हेलकाव्यांचा काळ

Patil_p

दुसऱया दिवशीही बाजारात घसरणच

Patil_p

इंडिगोला परिस्थिती पूर्ववत होण्याची आशा

Patil_p

केर्न एनर्जीच्या बाजुने निवाडा

Omkar B

निकालाच्या उत्सुकतेमुळे सेन्सेक्स झेपावला

Patil_p

इन्फोसिसचा महसूल 12 टक्क्यांनी वधारला

Patil_p
error: Content is protected !!