राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील ११७०६ शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनात्मक लाभार्थी अनुदान मंजूर करण्यात आले आहे व याची नुकतीच यादी प्रसिद्ध झाली आहे, या मध्ये बँक ऑफ बडोदा ७०, बँक ऑफ इंडिया १६८, बँक ऑफ महाराष्ट्र ३०, आय सी आय सी आय १, के डी सी सी बँक११३९८, आर, बी एल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया १५, युनियन बँक ऑफ इंडिया १५ या बँकेचा समावेश आहे.
या योजनेतील पात्र लाभार्थीनी आपले सरकार केंद्र व बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन प्रमाणीकरण घ्यायचे आहे,आधार प्रमाणित करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक घेऊन संबंधित बँकेत जमा करायचे आहे, प्रमाणीकरण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था युसूफ शेख यांनी दिली आहे, तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Kolhapur : जिल्ह्यात पावसाचे थैमान