Tarun Bharat

बळीराजाच्या दसऱ्याला ‘प्रोत्साहन’ची गोडी

जिल्ह्य़ातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार 550 कोटी : 1 ऑक्टोबरपासून मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

धीरज बरगे/कोल्हापूर

बळीराजाच्या दसऱ्याला यंदा प्रोत्साहनपर अनुदानाची गोडी मिळणार आहे. जिल्हय़ातील प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या पावणे दोन लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे सुमारे 550 कोटी रुपये मिळणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरवात होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानासाठी निधीची तरतुद करण्यात आली. यानंतर प्रामाणिक कर्जफेड करणाऱया शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली. मात्र अनुदानासाठी महाविकास आघाडी सरकारने घातलेल्या अटींमुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी वंचित राहणार होते. त्यामुळे अटींमध्ये बदल करण्याची मागणी सुरु असतानाच राज्यात सत्तातर झाले. यासर्व घडामोडींमुळे निधीची तरतुद करुनही शेतकऱ्यांना गेली सहा महिने अनुदानाची प्रतिक्षा करावी लागत आहे. सत्तांतरानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घातलेल्या काही अटी शिथिल केल्या. तसेच सप्टेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार प्रत्येक जिल्हय़ातून प्रामाणिक कर्जफेड करणाऱया शेतकऱ्यांची यादी तत्काळ ऑनलाईन देण्याची सूचना सहकार विभागाला केली. त्यानुसार जिल्हय़ातील प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या सुमारे 2 लाख 11 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

हे ही वाचा : शारदीय नवरात्रौत्सवाला आरंभ

सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांना अनुदान
जिल्हय़ातील प्रामाणिक कर्जफेड करणाऱया शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड केल्यांनंतर शासनाकडून यादीची छाननी सुरु आहे. सहकार विभागाने दिलेल्या यादीमधून पेन्शनधारक, संस्थांचे संचालक अशा शेतकऱयांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाठवलेल्या यादीमधून सुमारे पावणे दोन लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाख मिळणार आहे.

35 हजार शेतकरी ठरणार अपात्र
प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्हय़ातील 2 लाख 11 हजार शेतकऱयांची यादी पोर्टलवर अपलोड केली आहे. मात्र शासनाने लावलेले निकष, पात्रता यानुसार सुमारे पावणेदोन लाख शेतकरी अनुदानास पात्र ठरतील असा अंदाज सहकार विभागातून व्यक्त होत आहे. त्यानुसार जिल्ह्य़ातील सुमारे 35 हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

जिल्हय़ातील शेतकऱ्यांना मिळणार 550 कोटी

शासनाचे निकष पात्रता यानुसार जिल्ह्य़ातील शेतकऱयांच्या यादीची छाननी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच यादीची छाननी पूर्ण होईल. यामध्ये सुमारे पावणे दोन लाख शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून त्यांना दसरा सणाच्या तोंडावर 550 कोटी रुपये मिळणार आहेत.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान
जिल्हय़ातील प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड करणाऱया शेतकऱयांची माहिती शासनाकडे सादर केली आहे. शासनाचे निकष, पात्रता यानुसार यादीची तपासणी सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होवून ऑक्टोबरच्या प्रारंभीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
– अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

Related Stories

मलकापूर येथील युवकाची उजळाईवाडी येथे आत्महत्या

Archana Banage

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलणाऱ्या बांधकाम अतिक्रमणावर कारवाई

Archana Banage

Shivaji University : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुकर

Archana Banage

कोल्हापूर : परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

Archana Banage

राजाराम महाविद्यालयातील शेकडो झाडे आगीत भस्मसात

Archana Banage

बंदी असतानाही पन्हाळ्यावर पर्यटकांची घुसखोरी

Archana Banage