वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी अरुणकुमार जगदीश यांची मुंबई इंडियन्स संघाच्या साहाय्यक फलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटकाचे माजी फलंदाज अरुणकुमार जगदीश यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 100 पेक्षा अधिक प्रथमश्रेणी सामने खेळले असून ते 1993 ते 2008 या 16 वर्षांच्या कालावधीत भारतीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर कर्नाटक संघाचे ते प्रमुख फलंदाज प्रशिक्षक आणि मेंटर अशी दुहेरी भूमिका निभावली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकाने पाठोपाठ दोनवेळा रणजी करंडक स्पर्धा तसेच इराणी करंडक आणि विजय हजारे करंडक स्पर्धा जिंकल्या होत्या.