Tarun Bharat

भारत अ संघामध्ये पुजारा, उमेशचा समावेश

मुंबई : पुढील महिन्यात भारत अ संघ बांगलादेशच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयासाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. बंगालचा सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे.

बांगलादेशच्या दौऱयामध्ये हे कसोटी सामने प्रत्येकी चार दिवसांचे राहतील. या दौऱयातील पहिली कसोटी 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर तर दुसरी कसोटी 6 ते 9 डिसेंबर दरम्यान होणार आहे. भारत अ संघामध्ये केरळच्या रोहन कुनुमलला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वाल आणि यश धूल हे या संघातील प्रमुख फलंदाज आहेत. बडोद्याचा अष्टपैलू अतित सेठ तसेच तिलक वर्मा यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

बांगलादेशचा भारतावर सनसनाटी विजय

Patil_p

खेळपट्टीच्या टीकाकारांवर रिचर्ड्सची टीका

Patil_p

गुरप्रीत सिंग विजेता

Patil_p

व्हॉलीबॉल लीगसाठी उद्या खेळाडूंचा लिलाव

Patil_p

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वी कोरोनाचा उद्रेक

Patil_p

ओमानच्या विजयात लुधियानाच्या जतिंदरची चमक

Patil_p