ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील बडे उद्योजक अनिरूद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. आज पहाटेपासून देशपांडे यांचे घर आणि कार्यालयात आयकर अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. देशपांडे यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे. देशपांडे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
आयकर विभागाने आज पुण्यात आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामध्ये अनिरूद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. देशपांडे हे सिटी ग्रुपचे चेअरमन आणि ऍमेनोरा पार्कचे सर्वेसर्वा आहेत. राज्यातील बडय़ा राजकाराण्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून आयकर विभागाने त्यांच्या कार्यालयावर धाड टाकल्याची माहिती आहे. देशपांडे यांचे घर आणि कार्यालयाची झाडाझडती सध्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
अधिक वाचा : धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती