वृत्तसंस्था / लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया अर्सेनल एफसी संघाचे व्यवस्थापक तसेच प्रमुख प्रशिक्षक मायकेल आर्टेटा यांच्या करारात दोन वर्षांची वाढ करण्याचा निर्णय या क्लबच्या व्यवस्थापन समितीने घेतला.
अर्सेनल एफसी संघाने शुक्रवारी स्पेनचे आर्टेटा यांच्यासमवेत नवा करार केला असून त्यांच्या कराराच्या मुदतीत दोन वर्षांची वाढ देण्यात आली आहे. आता ते 2024-25 प्रीमियर लीग क्लबस्तरीय फुटबॉल हंगामापर्यंत अर्सेनल एफसीचे व्यवस्थापक म्हणून राहतील. गेल्या उन्हाळी मोसमात अर्सेनल संघात दाखल झालेले जोनाथ इडेवॉल यांच्या करारातही एक वर्षांची वाढ करण्यात आली आहे.