Tarun Bharat

चांदोली धरणातून सुरु असलेल्या विसर्गात वाढ ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Advertisements

Sangli Rain Update : शिराळा तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चांदोली धरण ८४.४४ टक्क्यांपर्यंत भरले असून या धरणाची ३४.४० टीएमसी इतकी साठवण क्षमता आहे. तर सध्या धरणामध्ये २८.७८ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने रविवारी चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे ०.२५ मीटरने उचलून पाणी सांडव्यातून १३०० तर विद्युत निर्मितीतून १७०० असे एकूण ३००० क्युसेकने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे.

तर दुसऱ्या दिवशी चांदोली धरणातून सुरु असलेल्या २९५३ क्युसेक विसर्गमध्ये वाढ करून विद्युत गृहातून १६२८ क्युसेक व वक्राकार दरवाजातून ४००० क्युसेक असे एकूण ५६२८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तहसीलदार गणेश शिंदे व धरण व्यवस्थापनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related Stories

मराठा आरक्षण : सांगली, मिरजेच्या आमदारांच्या दारात भर पावसात हलगी बजाव आंदोलन

Abhijeet Shinde

प्रेमप्रकरणातून मित्राचा निर्घृण खून

Omkar B

सांगली : वारणा धरणात 31.38 टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

चोरीस गेलेला १६ लाखांचा बकरा कराडात सापडला

Abhijeet Shinde

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. मानसिंगराव नाईक यांनी घेतली आढावा बैठक

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात सहा जणांचा बळी, विक्रमी 354 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!