Tarun Bharat

हवामान बदलामुळेच पूरस्थितीत वाढ

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

पूर्वी बिहार, बंगाल, ओरिसा येथेच पूर येत होते. आता 11 राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होत असून, हवामान बदलाच्या ‘ग्लोबल दुष्परिणामांवर’ लोकल उपाय आवश्यक आहेत, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी येथे व्यक्त केले.

हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने ‘तेर पॉलिसी सेंटर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या एक दिवसाच्या लोक अदालतीत ते बोलत होते.

अधिक वाचा; पक्षांतर बंदी कायद्यानुसार 16 बंडखोर आमदार अपात्र ठरतात : डॉ. उल्हास बापट

राजेंद्रसिंह म्हणाले, सर्व नैसर्गिक संपदेचे केंद्रीकरण करण्याच्या हव्यासाने हवामान बदल घडून येत आहेत. अभयारण्ये एका बाजूला आणि खाणी त्यांच्या शेजारी उभ्या राहणे, चिंताजनक आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम जागतिक पातळीवर होत असले, तरी उपाय स्थानिक पातळीवर करता येण्यासारखे आहेत. मात्र, त्याचे धडे कोणत्याही अभ्यासक्रमात नाहीत.

Related Stories

म्हैसूर दसरोत्सव उद्घाटन होणार राष्ट्रपतींच्या हस्ते

Patil_p

सामूहिक कार्यक्रमांना सशर्त मंजुरी

Patil_p

हरियाणात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 19,369

Rohan_P

‘वंदे भारत मिशन’ : परदेशात अडकलेल्या 6 हजार 37 भारतीयांची घरवापासी

Rohan_P

‘ज्ञानवापी’चे 50 टक्के सर्वेक्षण पूर्ण

Patil_p

खरी मर्दानी आता ओटीटीवर

Patil_p
error: Content is protected !!