नवी दिल्ली :
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 16 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 4.54 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या योगे देशाचा विदेशी चलन साठा 674.66 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे.
या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 4.8 अब्ज डॉलर्सने घटून 670.11 डॉलर्स वर घसरला होता. दुसरीकडे 16 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाची चलन मालमत्ता 3.60 अब्ज डॉलर्सने वाढून 591.56 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे तर दुसरीकडे देशाचा सुवर्ण साठा 86.5 कोटी डॉलर्सने वाढून 60.10 अब्ज डॉलर्सवर पोहोचला.