Tarun Bharat

विदेशी चलनसाठय़ात तिसऱया आठवडय़ातही वाढ

चलनसाठय़ात 2.9 अब्ज डॉलरने वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील विदेशी चलन साठा सलग तिसऱया आठवडय़ामध्ये वाढल्याचे दिसून आलेले आहे. 25 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ामध्ये विदेशी चलनसाठा 2.9 अब्ज डॉलरने वाढून 550.14 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संबंधीची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 2.54 अब्ज डॉलरने विदेशी चलन साठा वाढून 547.25 डॉलरवर पोहोचला आहे. ऑगस्ट 2021 नंतर देशातील विदेशी चलन साठय़ामध्ये या आठवडय़ामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आलेली आहे.

मागच्या वर्षी घसरण

ऑक्टोबर 2021 मध्ये विदेशी चलन साठा 445 अब्ज डॉलर इतक्या सर्वकालिक स्तरावर पोहोचला होता. पण त्यानंतर विविध जागतिक घडामोडीमुळे चलनसाठय़ामध्ये घट सुरू झाली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, आयात करणे महाग झाल्याने त्याचप्रमाणे रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये घसरणीत राहिल्याने याचा परिणाम विदेशी चलन साठय़ावर दिसून आला.

Related Stories

ओएलएक्स करणार ‘चिंगारी’मध्ये गुंतवणूक

Patil_p

क्रॉम्प्टन ग्रीव्हजची बटरफ्लायमध्ये हिस्सेदारी

Patil_p

बांधकाम क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणुकीत वाढ

Patil_p

फ्लिपकार्ट ग्राहकांच्या सुविधांवर देणार भर

Patil_p

हिरोमोटोने सर्व प्रकल्पातील काम थांबविले!

Patil_p

दिव्यांगांच्या मदतीसाठी‘ऍपल’चे नवे फिचर

Patil_p