Tarun Bharat

हिरवा वाटाणा-हरभरा आवकेत वाढ

विविध ठिकाणांहून दाखल : शहरातील मुख्य बाजारपेठेसह चौका-चौकात विक्री

प्रतिनिधी /बेळगाव

मागील काही दिवसांपासून बाजारात हिरवा वाटाणा आणि हरभरा दाखल होऊ लागला आहे. दोन दिवसांत आवक वाढली आहे. हिवाळी हंगामात बाजारात हिरवा वाटाणा आणि हरभऱयाची आवक असते. त्याप्रमाणे आवक वाढू लागली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेबरोबर चौका-चौकातदेखील वाटाणा आणि हरभरा दिसू लागला आहे.

बाजारात आलेल्या हिरव्या वाटाण्याची आणि हरभऱयाची चव चाखता येत आहे. विशेषतः महिला वर्गांकडून हिरवा वाटाणा खरेदी केला जात आहे. किरकोळ भाजीपाला बाजारासह, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, काकतीवेस, शनिवार खुंट, समादेवी गल्ली आदी ठिकाणी हिरवा वाटाणा आणि हरभऱयाची विक्री सुरू आहे. हिवाळय़ाला सुरुवात झाल्यानंतर गृहिणीला हिरव्या वाटाण्याची प्रतीक्षा असते. आता तीही पूर्ण झाली आहे. एरव्ही डिसेंबरमध्ये दाखल होणारा वाटाणा व हरभरा यंदा नोव्हेंबरमध्येच दाखल झाला आहे.

मागील चार दिवसांत वातावरणात सातत्याने बदल होत आहे. पहाटे धुके, दुपारी ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरण असा बदल दिसत आहे. त्यामुळे पिकांवरही परिणाम होत आहे. तर काही प्रमाणात थंडीदेखील जाणवू लागली आहे.  भाजीपाल्याच्या दरात हळुहळू घसरण होत आहे. हिरवा वाटाणा 90 रु. किलो तर हिरवा हरभरा 10 रु. पेंडीप्रमाणे विकला जात आहे.

गतवषी परतीचा पाऊस अधिक प्रमाणात झाला होता. त्यामुळे हिरवा वाटाणा आणि हरभऱयावर परिणाम झाला होता. मात्र यंदा पाऊस वेळेत व कमी झाला आहे. त्यामुळे वाटाणा आणि हरभरा पीक जोमाने येत आहे. शिवाय बाजारात देखील हिरवा वाटाणा आणि हरभऱयाची आवक वाढत आहे. दररोजच्या आहारात भाजीची चव वाढविण्यासाठी हिरव्या वाटाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे गृहिणींकडून वाटाण्याला पसंती दिली जात आहे. विशेषतः हिवाळय़ात अधिक प्रमाणात उत्पादित होणाऱया वाटाणा व हरभऱयाला मागणी वाढत आहे. बाजारात धारवाड, बैलहोंगल आदी ठिकाणांहून हिरवा वाटाणा आणि हरभरा दाखल होवू लागला आहे.

Related Stories

दुचाकीतील पेट्रोल चोरीच्या प्रकारांना कंग्राळी बुद्रुकमधील नागरिक वैतागले

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपाससाठी पुन्हा हुकूमशाही

Amit Kulkarni

अनगोळ येथील वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

Tousif Mujawar

तालुक्यात विकेंड कर्फ्यू जारी

Patil_p

प्रदूषण नियंत्रणासाठी शहरात धावणार प्रवासी ई-रिक्षा

Amit Kulkarni

दोनपेक्षा अधिक बाधित असल्यास घर सीलडाऊन

Amit Kulkarni