प्रतिनिधी /मडगाव
प्रवाशांची होत असलेली गर्दी पाहून कोकण रेल्वे महामंडळाने लोकमान्य टिळक-थिवी-लोकमान्य टिळक ही खास हिवाळी रेल सेवा वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
01045 क्रमांकाची लोकमान्य टिळक-थिवी-लोकमान्य टिळक ही रेल्वे 26 मे, 28 मे, 30 मे, 1 जून आणि 3 जून पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
रेल्वे क्रमांक 01046 क्रमांकाची थिवी -लोकमान्य टिळक ही रेल्वे 27, 29, 31 मे तसेच 2 जून, 4 जूनपर्यत वाढविण्यात आलेली आहे. यापूर्वी ही रेल्वे 24 मे पर्यंत निश्चित करण्यात आलेली होती.