Tarun Bharat

10 पैकी 4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

सेन्सेक्समधील  आघाडीवरच्या 10 पैकी 4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 2 लाख कोटींची भर पडली आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल सर्वात अधिक वाढलेले पहायला मिळाले आहे.

4 कंपन्यांचे बाजार भांडवल मागील आठवडय़ात 2 लाख 31 हजार 320.37 कोटी रुपयांनी वाढले आहे. मागील आठवडय़ात बीएसई सेन्सेक्स 884.57 अंकांनी वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रिजसह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस व आयसीआयसीआय बँक यांचे भांडवल वाढले आहे. पण एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एलआयसी, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी व भारती एअरटेल यांच्या बाजार भांडवलात मात्र घट झालेली पहायला मिळाली.

Related Stories

देशामध्ये सेवा क्षेत्राचा वेग मंदावला

Amit Kulkarni

बायजूसकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध

Patil_p

मायक्रोसॉफ्ट देणार 3 हजार जणांना रोजगार

Patil_p

मारुतीच्या विक्रीत 47 टक्क्मयांची घसरण

Patil_p

‘तेजीची लस’

Omkar B

आयओसीच्या 5 किलोच्या सिलेंडरचे नामकरण

Patil_p