Tarun Bharat

राष्ट्रध्वजाच्या विक्रीमुळे पालिकेच्या तिजोरीत वाढ

Advertisements

संपूर्ण कर भरणाऱयांना मोफत ध्वजाचे वाटप, तब्बल 8 हजाराहून अधिक नागरिकांनी भरला कर

प्रतिनिधी/ सातारा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच प्रामुख्याने दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज अनेक ठिकाणी फडकविण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून सातारा पालिकेच्या वतीने संपुर्ण कर भरणाऱयांना मोफत ध्वजाचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत मात्र वाढ होताना दिसत आहे.

 कारण काही दिवसांपुर्वीच ही योजना सुरू केली आहे, पण आत्तापर्यंत तब्बल 5 हजार ध्वजांचे वाटप करण्यात आले आहे. अद्याप अनेकांना ध्वज वाटप करणे बाकी आहे. आत्तापर्यंत तब्बल 8 हजाराहुन अधिक नागरिकांनी कर भरले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आले आहे. त्यामुळेच पालिकेच्या वतीने आणखीन 10 हजार ध्वजांची मागणी करण्यात आली आहे.

 हे ध्वज टपाल विभागाच्या माध्यमातून पालिकेस मिळणार आहेत. ध्वज घेण्याकरीता पालिकेच्या मुख्य कार्यालयासह शाहुपुरी, विलासपुर, गोडोली, सदरबझार येथील केंद्रात ही ध्वज घेण्याकरीता नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे पालिकेकडे आत्तापर्यंत 18 टक्के हुन अधिक रक्कम वसुल झाली आहे.

Related Stories

लस नाही तर प्रवेश नाही

datta jadhav

RT-PCR रिपोर्ट उशीरा येत असल्याच्या तक्रारी वाढल्या

datta jadhav

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय कॅबिनेटने केली ‘ही’ घोषणा

Abhijeet Shinde

वेरुळी सोमेश्वरवाडी परिसरात बिबटय़ाचा वावर

Patil_p

प्रज्ञा सातव यांच्यासाठी बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीस यांना भेटले

Sumit Tambekar

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद राहणार

Patil_p
error: Content is protected !!