नवी दिल्ली
डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत पेटीएमचा तिमाहीतील अहवाल नुकताच जाहीर झाला असून त्यांच्या तोटय़ात वाढ नोंदवली गेली आहे. 30 जूनला संपलेल्या तिमाहीत तोटा 644 कोटी रुपयांवर पोहचला होता. यापूर्वी मागच्या वषी समान कालावधीत तोटा 380 कोटी रुपयांवर राहिला होता. पण जूनला संपलेल्या तिमाहीत एकत्रित उत्पन्नात 1680 कोटी रुपयांवर पोहचले.