Tarun Bharat

ऐच्छिक एचआयव्ही टेस्ट करणाऱ्यांत वाढ

दररोज सरासरी दोनशे सव्वादोनशे जणांच्या ब्लड सॅम्पलची तपासणी : रक्त तपासणीतून एचआयव्हीचे निदान : जागतिक एडस् जनजागृतीदिन विशेष

कृष्णात पुरेकर/कोल्हापूर

जिल्ह्यात एड्स नियंत्रणात.., ही गुड न्यूज आहे. एड्स विषयक प्रबोधन, जनजागृती आणि तपासणी अशा मोहिमा शासनाच्या गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाकडून राबविल्या जात आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. त्यातच आता रक्ततपासणीवेळी एचआयव्हीची तपासणी करून या आरोग्य विभागाच्या मोहिमेलाही बळ मिळत आहे. इतर आजारापणात रक्त तपासणी करताना एचआयव्हीची टेस्ट केली जातेच, पण आता एचआयव्ही ऐच्छिक टेस्ट करणाऱ्यांमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. याआधी 10 टक्के असणारे हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढल्याची जिल्ह्याची आकडेवारी सांगते. जागतिक एड्स जनजागृती दिनाचे औचित्य साधून एचआयव्हीविषयी जाणून घेताना सकारात्मक आरोग्यदायी चित्र दिसते आहे.

रक्त तपासणीवेळीच एचआयव्हीची तपासणी करा मोहीम यशस्वी
जिल्ह्यातील एड्सग्रस्तांच्या संख्येत 5 वर्षांत घट होण्यामागे आरोग्य विभागासह जिल्हा एडस् प्रतिबंध पथकाची रक्त तपासणीवेळीच एचआयव्ही तपासणी करा, ही मोहीम यशस्वी ठरली आहे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी करताना लक्षणे पाहून डॉक्टर एचआयव्ही टेस्टचा उल्लेख करतात, यामागे स्वतःसह इतरांना इन्फेक्शन होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.

दररोज दोनशे सव्वादोनशे सॅम्पलची तपासणी
जिल्हा एडस् नियंत्रण पथकाच्या आयसीटीसी सेंटरद्वारे सीपीआरमध्ये रोज 75 ते 80 ब्लड सॅम्पल तपासणीसाठी येतात. याशिवाय सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची रोज 125-150 ब्लड सॅम्पल असतात. या सर्व सॅम्पलची एचआयव्ही टेस्ट केली जाते, अन् रिपोर्टही दिले जात आहेत. ब्लड सॅम्पलमधील 40 टक्के सॅम्पल ही ऐच्छिक एचआयव्ही तपासणी करणाऱ्यांची आहेत, हे सकारात्मक चित्रच एचआयव्ही नियंत्रणात आणण्यात उपयुक्त ठरलेय.

रक्त तपासणीवेळी एचआयव्ही टेस्ट
डोळयांचे विकार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ताप, खोकला, हिपॅटायटीस बी, लैगिंक संक्रमित आजार, दुर्धर आजार, हारपिस नागिनीचा संसर्ग, सातत्याने घटणारे वजन, वारंवार तोंड येणे, सिव्हीअर डायरिया, टीबी यासारख्या आजारात रक्त तपासणीवेळीच एचआयव्ही तपासणी केली जाते. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांपूर्वी होणाऱया रक्त तपासणीत एचआयव्ही टेस्टही अंतर्भूत आहे. गर्भारपणात प्रसुतीपूर्व तीनवेळा गर्भवतीच्या रक्ताची एचआयव्ही टेस्ट होते. पण या ब्लड टेस्ट क्लिनिकल बेसवर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होत आहेत. सीपीआरमधील अशा तपासणीचे प्रमाण 70 टक्के आहे.

मेडीकल फिटनेस, आरोग्यासाठी एचआयव्ही टेस्ट

अलीकडे स्वतःहून एचआयव्ही टेस्ट करणाऱयांची संख्या वाढली आहे. याला मेडीकल फिटनेससंदर्भातील जागृती कारणीभूत आहे. सद्यःस्थितीत 19 ते 40 वयोगटात एचआयव्हीची लक्षणे आढळण्याचे प्रमाण 38 टक्के आहे. त्यामुळे वैयक्तिक तपासणीमागे भीतीइतकीच दक्षताही कारणीभूत आहे. ऐच्छिक एचआयव्ही तपासणी करणाऱ्यांचे प्रमाण 5 वर्षांत 40 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यापूर्वी ते 10 टक्के होते. एड्सविषयी जनजागृतीने ऐच्छिक एचआयव्ही टेस्ट करणाऱ्यांत 30 टक्के वाढ झाली आहे. विविध कंपन्यांसह, शासकीय स्तरावरही मेडीकल फिटनेस सर्टिफिकेटची मागणी होत आहे. त्यातूनही रक्त तपासणीसोबत एचआयव्ही टेस्ट करणाऱयांचे प्रमाण वाढल्याची माहिती पथकाने दिली.

एचआयव्ही टेस्ट आवश्यक का?
लैंगिक संक्रमणातून एचआयव्हीचा विषाणू शरीरात जातो, पण त्याचा विंडो पिरियड सुरू होईपर्यत एचआयव्ही आहे, हे समजून येत नाही. पण काही दिवस रूग्णांत फ्ल्यू टाईप तापाची लक्षणे दिसतात. औषधाने तात्पुरता हा ताप कमी होतो. विंडो पिरियडमध्ये रूग्णाला रोज येणारा ताप, जुलाब, वारंवार खोकला, महिनाभरात वजन 10 टक्क्यांनी कमी होणे, हारपिस नागीनसारखे त्वचाविकार, वारंवार तोंड येणे आदी लक्षणे दिसतात, अन् त्यातूनच रक्ताच्या एचआयव्ही तपासणीतून एचआयव्हीचे निदान होते. लवकर निदान आणि औषधोपचार झाल्यास रूग्ण सामान्य जीवन जगू शकतो. त्यामुळे रक्त तपासणीसोबत एचआयव्ही टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

भारतात प्रतिवर्षी एसटीडीचे साडेतीन कोटी रूग्ण

लैंगिक संक्रमित रोगांना (एसटीडी), व्हेंनेरल म्हणून ओळखतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात एसटीडीचे प्रतिवर्षी साडेतीन कोटी रूग्ण आढळतात. असुरक्षित लैगिंक संबंध नसतानाही याची लागण होते. एचआयव्हीचा धोका वाढतो त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि दक्षता आवश्यक आहे. -डॉ. श्रीया पाटील, सुरक्षा क्लिनिक प्रमुख सीपीआर

Related Stories

बाप-बेटे जेलमध्ये जाणार; कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू

datta jadhav

नमाज पठण करण्यासाठी चारमिनार खुला करा – काँग्रेस नेते राशिद खान

Archana Banage

जरगी येथे गवा रेड्यांचा भातपिकांत हैदोस

Archana Banage

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – चित्रा वाघ

Archana Banage

सोलापूर शहरात 49 कोरोनाबाधितांची भर, दोघांचा मृत्यू

Archana Banage

तौक्ते चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे कंट्रोल रुममध्ये

Archana Banage