नवी दिल्ली
गेल्या ऑगस्ट महिन्यात रेल्वे माल वाहतुकीत 8 टक्के इतकी मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. यासोबत रेल्वेच्या महसुलातही 18 टक्के वाढ झाल्याची माहिती असून वार्षिक तत्वावर कोळसा वाहतुकीत 20 टक्के वाढ झाली आहे.
ऑगस्टमध्ये रेल्वेने 58 दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली आहे. मागच्या वषी याच महिन्यात 48 दशलक्ष टन कोळसा रेल्वेने वाहतूक केला होता.