Tarun Bharat

वायव्य परिवहन महामंडळाच्या महसुलात वाढ

Advertisements

16 मे पर्यंत 6 कोटी 14 लाख महसूल जमा

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वायव्य परिवहन महामंडळाच्या महसुलात वाढ झाली आहे. दि. 16 मे 2022 पर्यंत 6.14 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. कोरोनामुळे गेली 2 वर्षे वायव्य परिवहन महामंडळाच्या महसूलावर परिणाम झाला होता. वायव्य परिवहन महामंडळाला लाखेंचा फटका सोसावा लागला. अलीकडच्या काळात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली असली तरी म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते. मात्र महामंडळाचे अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे.

कोरोनानंतर महसूल प्राप्तीचा हा सर्वात मोठा आकडा असल्याचा दावा महसूल विभागाने केला. कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन काही महिन्यांपासून पूर्वपदावर  आले आहे. खाजगी वाहनांबरोबर वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेसनाही गर्दी होत आहे. शहर व ग्रामीण भागात धावणाऱया बसेस पूर्ण क्षमतेने धावताना दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बसेसना प्रवाशांची गर्दी होत असल्याने महामंडळाने समाधान व्यक्त केले होते. 

मे महिन्यांत सरासरी 5.22 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. 16 मेपर्यंत हा आकडा 6.14 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी, नियंत्रक, वाहक, चालक, तंत्रज्ञ यासह महामंडळाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांचा कर्तव्यदक्षपणा व सहकार्यामुळेच महसूलात वाढ झाली आहे, असे मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी सांगितले. तसेच सर्व अधिकारी व  कर्मचाऱयांचे त्यांनी अभिनंदन केले.

Related Stories

मुलांना छंदाकडे वळविण्याची गरज

Amit Kulkarni

शहापूर गटारींच्या खोदाईमुळे नागरिकांना त्रास

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील कागदपत्रे ताब्यात

Patil_p

भरपावसात पोलिसांचे पथसंचलन

Patil_p

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

Amit Kulkarni

कणकुंबीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त

Omkar B
error: Content is protected !!