Tarun Bharat

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Advertisements

मांजरी : पश्चिम महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीला मिळणाऱ्या पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसात प्रचंड प्रमाणात वाढ झाली.

जुलै महिण्यात झालेल्या पावसाने पाणी पातळी संथ गतीने वाढली होती यावेळी मात्र नदीकाठावरील माळी भाग एका दिवसात पाण्याखाली गेला. सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. 

मळी भाग व पोटमळी मधील चारा पिके, गवत पुन्हा पाण्याखाली गेले. त्याचप्रमाणे नदीला जोडणाऱ्या ओढे व नाल्यांच्या पाणी पात्रातही पाणी शिरल्याने ओढे, नाले काठावरील पिकेही पाण्याखाली गेली आहेत. नदीपात्रातील पाणी जलदगतीने काठावर पसरत असून ओढे व नाले पात्रात मात्र संथ गतीने पाणी पातळी वाढत आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच पाणलोट क्षेत्र व उपनद्या विभागात पावसाची रिपरिप थोडी कमी झाली असली तरी नदीपात्रात कृष्णा व तिच्या उपनद्यांच्या पाण्याचा प्रवाह जोरदारपणे येत असून कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. विविध धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पात्राबाहेर पडले असून शेती वस्तीतील रस्ते पाण्याखाली जात आहेत.

मागील महिण्यात आलेल्या पुरात वीटभट्टी परीसरात पाणी शिरले होते. आता पुन्हा वीटभट्टी परीसरात पाणी घुसल्याने नदी पात्राला प्रचंड जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Related Stories

मॅक्सीकॅब सुरु करण्यास परवानगी द्या

Patil_p

अनिल भांडारे यांची गौड सारस्वत समाजाला 22 हजाराची देणगी

Patil_p

कुद्रेमनी साहित्य संमेलन 31 रोजी साधेपणाने करणार

Patil_p

युवा कार्यकर्त्यांतर्फे शंकरगौडा पाटील यांचा सत्कार

Patil_p

‘80 नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी’ वर महत्त्वपूर्ण माहिती

Patil_p

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोल्डन बुद्धिबळ संघटनेचे घवघवीत यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!