Tarun Bharat

महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये वाढ

वृत्तसंस्था/ पॅरिस

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने 2023 च्या टेनिस हंगामातील पहिल्या चार महिन्यांच्या कालावधीत होणाऱया महिलांच्या स्पर्धांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धांच्या बक्षीस रकमेतही विक्रमी 3.3 दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जानेवारी ते 30 मार्च 2023 या कालावधीत आयटीएफच्या नव्या 40 स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. गेल्या वषी आयटीएफने याच कालावधीत 15 स्पर्धा वाढविल्या होत्या. गेल्या वषी नव्या टेनिस स्पर्धांसाठी बक्षिसांची रक्कम 40 हजार डॉलर्स ठेवण्यात आली होती. आता या बक्षीस रकमेमध्ये खूपच वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बक्षीस रकमेमध्ये गेल्या वषीच्या तुलनेत यावषी 10 टक्क्मयांनी वाढ झाली असून आता ही रक्कम 16.5 दशलक्ष डॉलर्स इतकी विक्रमी राहील. आयटीएफ बोर्डच्या संचालकपदी मेरी पियर्स ही प्रमुख चेअरपर्सन आहे. आता विविध स्पर्धांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला टेनिसपटूंनाही समान बक्षिसाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

भारतीय महिलांचा ग्रेट ब्रिटनवर विजय

Patil_p

नेदरलँडस्चा भारतावर एकतर्फी विजय

Patil_p

भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 खेळणार

Patil_p

बांगलादेशचा विंडीजवर 6 गडय़ांनी विजय

Patil_p

भारत-पाकिस्तान उपांत्य लढत आज

Patil_p

इंग्लंडच्या रूटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

Patil_p