Tarun Bharat

तामिळनाडूत अमेरिकेन दूतावास आणि ज्यू वसाहतींच्या सुरक्षेत वाढ

Advertisements

तामिळनाडूत विशेष खबरदारी

वृत्तसंस्था /चेन्नई

राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱयानुसार तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये अमेरिकेचा वाणिज्य दूतावास तसेच डिंडीगुलमधील ज्यू वसाहतीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 31 जुलै रोजी अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी मारला गेल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

केंद्रीय यंत्रणांनी राज्य पोलिसांना अन्य पाश्चिमात्य देशांच्या वाणिज्य दूतावांसासह अमेरिका तसेच इस्रायलच्या दूतावासांची सुरक्षा वाढविण्यासाठी इनपूट दिले आहेत. अन्य देशांच्या दूतावासांच्या परिसरात गस्त वाढविण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

गाझामध्ये पॅलेस्टिनी वस्तींवर अलिकडेच इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी ज्यूंशी निगडित ठिकाणांना सुरक्षा पुरविण्याचा निर्देश दिला आहे. तर राज्य पोलीस विभागाचे सायबर गुन्हे शाखा अनेक संशयित व्यक्ती तसेच संघटनांच्या सोशल मीडिया पोस्टवर करडी नजर ठेवून आहे. तामिळनाडूचे पोलीस महासंचालक सी. सिलेंद्रबाबू यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिन सोहळय़ापूर्वी सुरक्षा उपाययोजनांकरता एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली आहे.

Related Stories

ड्रोन, रोबोट्स, विशेष स्टेथोस्कोपद्वारे लढा

Patil_p

सहा दहशतवाद्यांचा खात्मा दोन जवानांना हौतात्म्य

Amit Kulkarni

लखनौनजीक अपघातात 9 जणांचा मृत्यू, 3 बेपत्ता

Patil_p

दहशतवाद्यांचे ‘डाव’ रोखणारच!

Patil_p

अण्णाद्रमुक नेते पांडियन यांचे निधन

Patil_p

माना पटेलला मिळाली विद्यापीठ कोट्यातून ऑलिम्पिकची संधी

Patil_p
error: Content is protected !!