बेळगाव : येथील गोवावेस जवळील खाऊ कट्ट्यासमोरील मंगल ग्राऊंडवर गेल्या दि. 8 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या इंडियन क्राफ्ट बाजार प्रदर्शनाला बेळगावकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. आगामी गुढीपाडवा, रमजान व अक्षय्य तृतियाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या प्रदर्शनात एकाच छताखाली 100 हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताच्या विविध भागातील हँडलूम व हँडीक्राफ्ट उत्पादनांची मांडणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लखनवी चिकन सूट, टॉप्स, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी बांगड्या, कार्पेट्स, मधुबनी पेंटिंग्ज, सतरंजी, बनारसी, चंदेरी सिल्क साड्या, काथ्या वर्क साड्या, पश्चिम बंगालच्या साड्या, बेडकव्हर, दिवान सेट, केरळ व बॉम्बे फॅन्सी ज्वेलरी, राजस्थानी मोजडी, फॅन्सी चप्पल, लेदर बॅग्ज, कॉटन बॅग्ज, टॉप्स, कॉटन शर्ट, टी-शर्ट, पंजाबी सूट व फुलकारी आयटम्स, मंगलगिरी ड्रेस मटेरियल, कॉटनच्या साड्यांबरोबरच काश्मिरी साड्या व सूट, भव्य अशा स्टॉल्सवर शोभेच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या चिनीमातीच्या बरण्या, फ्लॉवर पॉट्स, बोन्साय प्लांट पॉट्स, फिरोजाबाद हँडमेड लॅम्प्स, जोधपूर पेंटिंग्ज, शोभेच्या वस्तू, फुलपात्रे, सर्व प्रकारची क्रॉकरी, नागालँड ड्राय फ्लॉवर्स, मातीची भांडी, बेडकव्हरमध्ये खेकडा, जयपुरी व झाशी बेडशीट्स याचबरोबर लेटेस्ट जोधपूर हँडीक्राफ्ट ब्रास वॉल हॅगिंग्ज आदी वस्तूंचा समावेश आहे. प्रदर्शनात अनेक वस्तूंवर सवलत दिली जात आहे. तसेच क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर खरेदी करणाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली जात आहे. प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश असून पार्किंग सुविधा उपलब्ध आहे.
पुस्तकांचेही प्रदर्शन
या प्रदर्शनात पुस्तकांचेही भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून अनेक मान्यवर लेखकांची इंग्रजीमधील पुस्तके प्रत्येकी शंभर रुपये, दोनशे रुपये किलो दराने विकली जात आहेत. पुस्तकांच्या निवडीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. हे प्रदर्शन आणखी थोडेच दिवस असल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.