Tarun Bharat

अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट कॅबिनेटचा अधिकारग्रहण

समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन

बेळगाव : अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट कॅबिनेटचा अधिकारग्रहण समारंभ मुधोळ येथे नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून क्लब इंटरनॅशनलचे दुसरे आयव्हीपी मतिवतन रामलिंगम, डॉ. तिम्मन्ना अरळीकट्टी, पीएमसी कमिशनर एस. जी. अंबिगेर, व्यंकण्णा गिडाप्पण्णावर, अदृषप्पा देसाई आदी उपस्थित होते.

ऍड. दिनकर शेट्टी यांनी मुधोळ क्लबची स्थापना केली असून यावेळी वंदना कुलकर्णी यांना अलायन्स क्लब मुधोळ संस्कृतीच्या अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. डी. एम. बेन्नूर यांना अलायन्स क्लब मुधोळच्या अध्यक्षपदाची तसेच बसवराज कोळी यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, मानसी निंबाळकर पहिल्या व्हिडीजी, लक्ष्मण जंबगी यांना दुसरे व्हिडीजी म्हणून शपथ देण्यात आली. तसेच रुपा जी. यांना कॅबिनेट सेपेटरी, बसवराज हेगडे कॅबिनेट ट्रेजरर, ऍड. रुपा पाटील पिआरओ यांनाही सूत्रे सोपविण्यात आली. मतिवतन यांनी समाजासाठी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले. इन्स्टॉलेशन कमिटीचे चेअरमन ऍड. शिवानंद मुळ्ळूर यांनी शुभेच्छा दिल्या. वाळवेकर यांनी स्वागत केले. रश्मि व तन्वी गिरड्डी यांनी सूत्रसंचालन केले. वाळवेकर यांनी स्वागत केले शंकर सावंत यांनी प्रार्थना म्हटली. स्मिता टी. यांनी आभार मानले.

Related Stories

उचगाव-बेकिनकेरे-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

शुक्रवारी जिह्यात 18 नवे रुग्ण

Patil_p

जमखंडीत परिवहन कर्मचाऱयांना लसीकरण

Patil_p

गाळे रिकामी करण्यासाठी कारवाईचा विचार

Amit Kulkarni

कापड दुकानामध्ये उडतोय सोशल डिस्टनंचा फज्जा

Patil_p

कंत्राटी आरोग्य कर्मचारी आजपासून संपावर

Patil_p