ऑनलाईन टीम / अहमदाबाद
चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला. भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडवर सहज विजय मिळवला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघास भारताचे फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली. या विजयासोबतच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला. आता भारतासमोर पुढील चॅम्पियनशिपचे लक्ष्य असणार आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल या दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केली. मात्र ४३ धावांवर अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली होती.
इंग्लंड संघ या धावाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातंही उघडू शकला नाही. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडसमोर पराभवाचं संकट निर्माण केलं. इंग्लंडची धावसंख्या २० ओव्हर्सनंतर ४० धावांवर ४ बाद अशी झाली होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडवर पराभवाचं संकट निर्माण केलं. डॅन लॉरेन्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. इंग्लंडचे सहा फलंदाज एक अंकी धावसंख्येवरच तंबूत परतले.


previous post