Tarun Bharat

तरुण भारत-लोकमान्यतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

तरुण भारततर्फे सोमवारी हिंडलगा येथील कार्यालयात स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रिटिंग विभागातील कर्मचारी रमेश जाधव यांच्या हस्ते यावर्षी ध्वजारोहण करण्यात आले. तरुण भारतच्या संचालिका रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, पीआरओ गिरीधर रविशंकर, सीएफओ उदय खाडीलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

संपादक जयवंत मंत्री म्हणाले, तरुण भारत परिवारामध्ये सर्वांना समान न्याय व संधी दिली जाते. कनि÷ दर्जाचा कर्मचारीही तितकाच महत्त्वाचा आहे हे संस्थेने आजच्या ध्वजारोहणातून दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. उदय खाडीलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी तरुण भारत परिवारातील सदस्य उपस्थित होते. प्रारंभी तरुण भारतच्या सिक्युरिटी कर्मचाऱयांकडून पथसंचलन करण्यात आले.

लोकमान्य सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिन

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे सोमवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रारंभी संचालक अजित गरगट्टी यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक पंढरी परब, सुबोध गावडे, डॉ. दामोदर वागळे, प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दिक्षित, सीएफओ विरसिंग भोसले, समन्वयक विनायक जाधव, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, बेळगाव रिजनल मॅनेजर एम. एन. पाटील यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

Related Stories

आनंद, हुबळी अकादमी, भटकळ स्पोर्ट्स क्लब विजयी

Amit Kulkarni

सुहास्य परिवारचा वर्धापन दिन उत्साहात

Amit Kulkarni

लोकोळीची पूर्वी पाटील थायलंड, मलेशिया दौऱयाची मानकरी

Amit Kulkarni

अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करा

Amit Kulkarni

मनोरंजनाची माध्यमे जबाबदारीने हाताळायल्या हवीत!

Patil_p

सावगाव येथे बारा जुगाऱयांना अटक

Patil_p
error: Content is protected !!