प्रतिनिधी /बेळगाव
प्रेस ओनर्स असोसिएशन
दि बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रेडिओ कॉम्प्लेक्स येथील मुद्रा भवन येथे झालेल्या कार्यक्रमात इंडियन नेव्हीचे निवृत्त अधिकारी हरेराम काद्रोळकर व असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपाध्यक्ष राजेंद्र भातकांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सेपेटरी श्याम मांगले यांनी आभार मानले. यावेळी उपसेपेटरी संतोष होर्तीकर, अशोक धोंड, सतीश जाधव, नंदकुमार देशपांडे, विलास सावगावकर, अजित कोळेकर, सर्वज्ञ कपिलेश्वरी, शिवाजी बाडीवाले, अरुण पाटील, रामलिंग धन्ना, उल्हास गायकवाड, संजू गवळी, शिवानंद वाघरवाडी, बाळू कदम, कृष्णा बाडीवाले, शशिकांत नाळकर, सिद्धार्थ पाटील, शांतीलाल भुरमल यासह इतर उपस्थित होते.
उषःकाल मंडळ
उषःकाल मंडळातर्फे लक्ष्मी टेकडी येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कोल्हापूर येथील सहसंघचालक भगतरामजी छाबडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय सीमा साळगावकर यांनी करून दिला. या कार्यक्रमात वयाची 80 व 90 वर्षे पूर्ण केलेल्या ज्ये÷ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. रत्नाकर कलघटगी, बाळकृष्ण होमकर, डॉ. पुंडलिक काळे, उमेश पंडित, मधुकर परांजपे, मधुकर बांदेकर, कृष्णानंद तेंडोलकर, वसंतराव नाईक, प्रताप कांगले, प्रतिभा कांगले, लक्ष्मण सलगर, गुलाबराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कॅप्टन खटावकर, नंदू बागी, अशोक अनगोळकर, सदानंद बैलूर, शिवाजी धुराजी उपस्थित होते.
एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज
गणेशपूर येथील एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा झाला. तिगडी, ता. बैलहोंगल येथील 71 वषीय गणप्पा नागदोडी यांनी वैद्यकीय शिक्षणाला मदत व्हावी, यादृष्टीने संस्थेला स्वच्छेने देहदान करण्याचा संकल्प केला. याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एसबीजी संस्थेचे घाटगे, अध्यक्ष अमित घाटगे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. मानसी घाटगे, प्राचार्य डॉ. एस. व्ही. गड्डीहल्लीशेट्टी, एसबीजी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य संतोष एस. उपस्थित होते. यानिमित्त संस्थेच्यावतीने विविध ठिकाणी रॅली व पथनाटय़ाचे आयोजन करण्यात आले होते.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ
रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. माळी गल्ली येथील सरकारी शाळेमध्ये क्लबच्या सर्व सदस्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. तंबाखू विरोधी जागृती, देहदानाबद्दल जागृती यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अध्यक्षा नयना नेर्ली, सेपेटरी सौरभ देसूरकर, खजिनदार धनराज राजगोळी, ईशान कलघटगी, मधुश्री, नगरसेवक संतोष पेडणेकर, रमेश कळसण्णावर, एम. के. अगसर, विष्णू कोप्पद, एस. एम. रसाळ, एस. डी. कदम, तेग्गी यासह इतर उपस्थित होते.
मच्छे येथील माजी सैनिक सेवा संघ
मच्छे येथील माजी सैनिक सेवा संघातर्फे संस्थेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी सदस्यांच्या गुणवंत मुला-मुलींचा रोख रक्कम, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम पाटील, निवृत्ती देसाई व संतोष जैनोजी यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे चेअरमन परशराम देसाई यांचे ‘आझादी का महापर्व’ या विषयावर भाषण झाले.
व्हिओटीसी ऑटो स्टँड
अयोध्यानगर येथे व्हिओटीसी ऑटो स्टँड येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विजय ऑर्थोपेडिक ऍण्ड ट्रामा सेंटरचे जनसंपर्क अधिकारी व सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अयोध्यानगर येथील नागरिक, रिक्षाचालक व फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तेजस्विनी एंटरप्रायझेस
तेजस्विनी एंटरप्रायझेस एचपी गॅस कंपनीतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी वितरक आशिष कालकुंद्री यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी कर्मचारी, मॅकॅनिकल आणि वितरक उपस्थित होते.
आरोग्य भारती बेळगाव
आरोग्य भारती बेळगावतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. 15 रोजी ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. सुनीता व आरोग्य भारतीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष गोपाळराव देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आरोग्य भारतीचे विभाग संयोजक वासुदेव इनामदार यांनी अमृतमहोत्सवाचे महत्त्व व प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य अधोरेखित केले.
आरोग्य भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद हलगेकर यांनी स्वातंत्र्य व त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांबद्दल माहिती दिली. दि. 14 रोजी आयोजित सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्यांच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेमध्ये संचित देशपांडे, अदम्या देसाई, स्पृहा इनामदार, प्रयांशी मजुकर, नैतिक पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. यावेळी क्लबच्या सदस्यांनी ग्रामीण व शहरी भागातील बऱयाच शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नावगे, खादरवाडी हायस्कूल खादरवाडी, सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक 45 व भारती विद्यालय हायस्कूल खासबाग या शाळांमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रवि हत्तरगी, सचिव अमित पाटील, दिनेश काळे, अभय शिंदे, अभय जोशी, माधवानंद कारेकर, रविंद्र थोरात, दामोदर लोहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सुभाषचंद्रनगर
सुभाषचंदनगर रहिवासी संघटनेतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. नगरसेवक रमेश मैल्यागोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. राजेश तेंडुलकर यांनी स्वागत केले. अर्चना खनगावकर, राधिका तेंडुलकर, अमिता भावे यांचे ‘माझा देश’ या विषयावर भाषण झाले. सर्व महिलांनी वंदे मातरम् हे गीत सादर केले. सुभाषचंदनगरचे अध्यक्ष उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर मिठाईचे वाटप केले. अविनाश खन्नुकर यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यदिनी जायंट्स सखीतर्फे विद्यार्थ्यांना फळेवाटप
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जायंट्स सखीने सरकारी शाळा क्रमांक 9 मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला. प्रारंभी नगरसेवक शंकर पाटील, चंद्रा चोपडे आणि ज्योती अनगोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी समाजसेवक आकाश हलगेकर, जायंट्स सखीच्या पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. यानंतर विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली.
माजी सैनिक संघटना
माजी सैनिक संघटना बेळगावतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या दिवशी संघटनेचे कार्यालय गणेशपूर रोड, ऑक्ट्रॉय नाका, शौर्य चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण संघटनेचे अध्यक्ष सुभेदार के. बी. नौकुडकर यांच्या हस्ते केले. यानंतर शौर्य चौकातील सैनिक पुतळय़ांना पुष्पहार घालून शहीद सैनिकांना दोन मिनिटांचे मौन राखून श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबद्दल अध्यक्ष सुभेदार के. बी. नौकुडकर यांनी विचार प्रकट करताना माजी सैनिकांना मिळणाऱया सुविधांबद्दल सांगितले. सर्व माजी सैनिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष ऑ. कॅप्टन नारायण पाटील, महासचिव सुभेदार मेजर पांडुरंग पाटील, छाया शिंदे, सचिव सुभेदार गंगाराम गवस, संचालक सीपीओ अशोक पाटील, हिराबाई भेंडवाडे, सुभेदार मेजर हनुमंत गुरव, ऑ. कॅप्टन लक्ष्मण मुंगारे, सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे, सुभेदार गोपाळ देसाई, ऑ. कॅप्टन प्रकाश मालवे, नायक मल्लाप्पा चौगुले, सरीता पाटील आणि संघटनेचे सभासद व माजी सैनिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन संघटनेचे महासचिव सुभेदार मेजर पांडुरंग पाटील यांनी केले. ऑ. कॅप्टन नारायण पाटील यांनी आभार मानले.