गोकाक, मुडलगी तालुक्मयात जोमाने प्रचार : सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा
प्रतिनिधी /बेळगाव
वायव्य शिक्षक मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेले एन. बी. बन्नूर यांनी प्रचारात आघाडी मिळविली असून त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला आहे. सोमवारी त्यांनी गोकाक आणि मुडलगी तालुक्मयांमध्ये जोरदार प्रचार केला. त्यावेळी अनेक शिक्षण संस्थांनी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
गेली अनेक वर्षे मी शिक्षकांच्या मागण्यांसाठी लढा देत आहे. शिक्षकांच्या समस्या मी जाणून घेतल्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार आहे. मात्र, मला एक वेळ संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी गोकाक व मुडलगी येथील विविध शिक्षण संस्था, कॉमर्स आणि आर्ट्स कॉलेजमधील प्राचार्य व प्राध्यापकांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला.
मला आपले एक अनमोल मत द्या आणि सेवा बजावण्यासाठी संधी द्या, अशी विनंती त्यांनी केली. उमेदवार एन. बी. बन्नूर यांनी केलेल्या या विनवणीला सर्वांनीच पाठिंबा दर्शविला. शिक्षक, प्राध्यापक यांना विविध समस्या भेडसावत आहेत.
वेतनातील तफावत, शाळा अनुदान देणे, याचबरोबर शिक्षकांच्या इतर समस्यांवर मी पूर्णपणे अभ्यास केला आहे. त्यासाठी यापूर्वी अनेकवेळा आंदोलने केली. मंत्री तसेच विधानसभेपर्यंत आवाज पोहोचविण्याचे काम केले आहे. तेव्हा एक वेळ संधी द्या, आपण तुमच्या समस्या सोडवू, असे त्यांनी आश्वासन दिले.
गेल्या काही दिवसांपासून अपक्ष उमेदवार एन. बी. बन्नूर यांनी बेळगाव जिल्हय़ातील विविध भागांमध्ये प्रचार सुरू केला असून प्रचारात आघाडी मिळविली आहे.