Tarun Bharat

दुसऱया दिवसअखेर भारत 6 बाद 229

हुबळी-कर्नाटक / वृत्तसंस्था

कर्णधार प्रियांक पांचाळने 87 धावा व यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने नाबाद 74 धावांची शानदार खेळी साकारल्यानंतर भारत अ संघाने न्यूझीलंड अ विरुद्ध अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवसअखेर 6 बाद 229 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. शुक्रवारी येथे दुसऱया दिवसात 66 षटकांचा खेळ झाला. पांचाळ व भरत वगळता भारत अ संघाचे आघाडी व मध्यफळीतील बरेच फलंदाज निष्प्रभ ठरले. कर्णधार पांचाळने 148 चेंडूत 12 चौकार व 2 षटकार फटकावले तर भरतच्या नाबाद खेळीत 104 चेंडूत 10 चौकारांचा समावेश राहिला. 4 बाद 68 अशी बिकट स्थिती असताना पांचाळ व केएस भरत ही जोडी जमली आणि त्यांनी 117 धावांच्या भागीदारीसह संघाला सुस्थितीत आणले.

Related Stories

दिल्लीत क्रीडा हालचालींना पुन्हा प्रारंभ

Patil_p

फख्र झमान न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

Omkar B

यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल : रोहित

Patil_p

भारतीय मल्ल रविंद्रचे आव्हान समाप्त

Patil_p

वनडेनंतर टी-20 मध्येही भारताचे क्लीन स्वीप

Patil_p

विजय हजारे चषकासाठी मुंबई-उत्तर प्रदेश आमनेसामने

Patil_p