Tarun Bharat

भारत अ संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे

Advertisements

न्यूझीलंड अ विरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा

मुंबई / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत अ संघ घोषित केला असून संजू सॅमसनकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. मालिकेतील पहिला सामना दि. 22 सप्टेंबर, दुसरा सामना दि. 25 सप्टेंबर व तिसरा व शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी होईल.

सॅमसनने यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवली असून त्याचा समावेश असणारा राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. सॅमसनने 17 सामन्यात 146.79 स्ट्राईक रेट, 28.63 ची सरासरी व 2 अर्धशतकांसह 458 धावांचे योगदान दिले. त्याची सर्वोच्च खेळी 55 धावांची राहिली.

याशिवाय, यंदा खेळलेल्या 6 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 5 डावात त्याने 44.75 च्या सरासरीने 179 धावांचे योगदान दिले. त्याची आयर्लंडविरुद्ध 77 धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. याशिवाय, 6 वनडेत त्याने 43.33 च्या सरासरीने 130 धावा केल्या. संघातील स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड देखील सध्या उत्तम बहरात असून त्याने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 127 चेंडूत 108 धावांची दमदार खेळी साकारली होती. 

भारत अ वनडे संघ ः पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा.

बॉक्स (16 एसपीओ 07-राज अंगद बावा)

हार्दिक पंडय़ाला पर्याय म्हणून राजला संधी

भारताच्या यू-19 वर्ल्डकप विजयाचा हिरो राज अंगद बावा याचा न्यूझीलंड अ संघाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत अ संघात समावेश केला गेला असून हार्दिक पंडय़ाला पर्यायी खेळाडू उपलब्ध असावा, या दृष्टीने त्याला स्थान देण्यात आले. राज अंगद बावा जलद-मध्यमगती गोलंदाज व मध्यफळीतील तडफदार डावखुरा फलंदाज म्हणून नावारुपास आला आहे. त्याने चंदिगडतर्फे दोन रणजी सामने खेळले आहेत.

शिवम दुबे, विजय शंकरसारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरेसे क्लिक होऊ शकत नाहीत, हे पाहता निवड समितीने नव्या खेळाडूंना आजमावणे सुरु केले असून राज अंगद बावाची निवड हा त्याचाच एक भाग मानला जातो. भारताकडे फिरकी गोलंदाजी अष्टपैलू बरेच आहेत. मात्र, मध्यफळीत फटकेबाजी करु शकणाऱया स्पेशालिस्ट जलद गोलंदाजांची वानवा आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज अंगद बावाला संधी देण्यात आल्याचे संकेत आहेत.

Related Stories

आशिष कुमार उपांत्यपूर्व फेरीत

tarunbharat

कोरोना लढा : लंकन क्रिकेट मंडळाकडून 10 कोटींची मदत

Patil_p

रॉजर फेडररचा आश्चर्यकारक विजय

Patil_p

क्रिकेटपटू झफर सर्फराजचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

प्रणॉयची लक्ष्य सेनवर मात, अर्जुन-कपिला, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

गुजरात-दिल्ली, महाराष्ट्र-प.बंगाल अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!