ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारताने बुधवारी ओडिशामध्ये स्वदेशी बनावटीच्या अभ्यास या हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट ( HEAT ) ची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) यांच्याकडून ओडिशाच्या चांदीपूर येथे ही चाचणी केली. ही चाचणी एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) या माध्यमातून घेण्यात आली.
या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. एका प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की, “या प्रणालीच्या विकासामुळे सशस्त्र दलांचे हवाई लक्ष्यांची भेदण्यासाठीची आवश्यकता पूर्ण होईल.” या प्रात्यक्षिकामध्ये ट्विन अंडर-स्लंग बूस्टर वापरून हवाई वाहन लाँच केले गेले.
विमान पूर्णपणे स्वायत्त उड्डाणासाठी प्रोग्राम केलेले आहे, म्हणजे ते स्वयंचलित प्रणालींच्या नियंत्रणाखाली उडते आणि मानवी पायलटच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.