Tarun Bharat

भारत अ संघाचा एकतर्फी वनडे मालिका विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ चेन्नई

यजमान भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाचा तीन सामन्यांच्या अनधिकृत वनडे मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश केला. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाचा 106 धावांनी दणदणीत पराभव केला.

या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्वबाद 284 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंड अ संघाचा डाव 38.3 षटकात 178 धावांत आटोपला. या शेवटच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसन आणि तिलक वर्मा तसेच शार्दुल ठाकुर यांची अर्धशतके तर राज बावाचे 4 बळी ही वैशिष्टय़े ठरली.

भारत अ संघाच्या डावामध्ये कर्णधार सॅमसनने 68 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 54, तिलक वर्माने 62 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 50, शार्दुल ठाकुरने 33 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 51, ईश्वरनने 35 चेंडूत 8 चौकारासह 39, त्रिपाठीने 2 चौकारासह 18 धावा जमविल्या. ईश्वरन आणि त्रिपाठी यांनी सलामीच्या गडय़ासाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी तिसऱया गडय़ासाठी 99 धावांची भर  घातली. भारत अ संघाच्या डावामध्ये 8 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंड अ संघातर्फे डफी, फिशर, रिपॉन यांनी प्रत्येकी दोन तर वॉकर आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंड अ संघातील सलामीचा फलंदाज क्लीव्हरने एकाकी लढत देत 89 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 83 धावा झळकविल्या. न्यूझीलंड अ संघातील इतर फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. रिपॉनने 3 चौकारासह 29, बोवेसने 1 चौकारासह 20, चॅपमनने 1 चौकारासह 11 आणि कर्णधार ब्रुसने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. न्यूझीलंड अ संघाच्या डावामध्ये 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. भारत अ संघातील राज बावाने 11 धावात 4, राहुल चहरने 39 धावात 2, कुलदीप यादवने 29 धावात 2, ऋषी धवन आणि त्रिपाठी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः भारत अ 49.3 षटकात सर्व बाद 284 (सॅमसन 54, तिलक वर्मा 50, शार्दुल ठाकुर 51, ईश्वरन 39, त्रिपाठी 18, ऋषी धवन 34, फिशर, डफी, रिपॉन प्रत्येकी दोन बळी, वॉकर, रचिन रविंद्र प्रत्येकी एक बळी.), न्यूझीलंड अ 38.3 षटकात सर्व बाद 178 (क्लीव्हर 83, रिपॉन 29, बोवेस 20, चॅपमन 11, ब्रुस 10, राज बावा 4-11, कुलदीप यादव 2-29, राहुल चहर 2-39, ऋषी धवन 1-27, त्रिपाठी 1-9).

Related Stories

शोएब अख्तरला व्हायचे आहे भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक!

Patil_p

गृहमंत्र्यांच्या हस्ते मिराबाई चानूचा गौरव

Patil_p

लंका दौऱयासाठी अफगाण संघ जाहीर

Patil_p

प्रणॉयची लक्ष्य सेनवर मात, अर्जुन-कपिला, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

भारताची जपानवर एकतर्फी मात

Patil_p

साऊदम्पटनकडून वेस्ट ब्रॉमविच पराभूत

Patil_p
error: Content is protected !!