Tarun Bharat

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी टी-20 आज

Advertisements

सर्व नजरा जसप्रित बुमराहच्या तंदुरुस्तीवर, भुवनेश्वरच्या खराब फॉर्ममुळे चिंतेची छटा

नागपूर / वृत्तसंस्था

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (शुक्रवार दि. 23) ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी पहिल्या टी-20 सामन्यातील नामुष्कीजनक पराभवाची परतफेड करणे हे संघाचे मुख्य लक्ष्य असेल. मात्र, जसप्रित बुमराहची तंदुरुस्ती पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहणार आहे. ही लढत सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.

इंग्लंड दौऱयानंतर संघाबाहेर पडलेला जसप्रित बुमराह पाठदुखीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकला नव्हता. मात्र, मोहालीत संपन्न झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याला खेळवले न गेल्याने त्याच्या तंदुरुस्तीविषयी साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हार्दिक पंडय़ाचा समावेश असलेल्या ‘साडेतीन’ जलद-मध्यमगती गोलंदाजांच्या ताफ्याने 14 षटकातच 150 धावांची लयलूट करु दिली, ते सर्वाधिक चिंतेचे ठरले होते.

संघातील सर्वात अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची झालेली धुलाई डोळय़ात अंजन घालणारी ठरली आहे. त्याचे डावातील 19 वे षटक भलतेच महागडे ठरत आले असून पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध टाकलेल्या डावातील 19 व्या षटकात त्याने एकत्रित चक्क 49 धावा मोजल्या आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत बुमराहची भेदक गोलंदाजी भारतासाठी मुख्य आशास्थान असेल.

दि. 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ फक्त 5 टी-20 सामने खेळणार असून ही देखील मुख्य डोकेदुखी आहे. यजुवेंद्र चहल महागडा ठरत आला असून त्या तुलनेत अक्षर पटेलने मागील लढतीत 3 बळी घेत आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती. फलंदाजीत रोहित व विराट स्वस्तात बाद झाल्यानंतरही केएल राहुल, हार्दिक पंडय़ा व सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीमुळे भारताने 200 धावांचा टप्पा सहज सर केला होता. तेच सातत्य आजच्या लढतीतही अपेक्षित असणार आहे.

संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍस्टन ऍगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन इलिस, कॅमरॉन ग्रीन, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झाम्पा.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रित बुमराह, उमेश यादव.

सामन्याची वेळ : सायं. 7 वा.थेट प्रक्षेपण  : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

मागील 6 सामन्यात शेवटच्या 3 षटकातील भारताची गोलंदाजी

प्रतिस्पर्धी / दिलेल्या धावा / एकूण / निकाल

  • पाकिस्तान / 10, 12, 11 / 33 / विजय
  • हाँगकाँग / 4, 21, 12 / 37 / विजय
  • पाकिस्तान / 8, 19, 7 / 34 / पराभव
  • श्रीलंका / 12, 14, 7 / 33 / पराभव
  • अफगाण / 8, 5, 18 / 31 / विजय
  • ऑस्ट्रेलिया / 22, 16, 4 / 42 / पराभव

भुवनेश्वरने डावातील 19 व्या षटकात दिलेल्या धावा

प्रतिस्पर्धी संघ / धावा / बळी

  • पाकिस्तान / 19 / 0
  • श्रीलंका / 14 / 0
  • ऑस्ट्रेलिया / 16 / 0.

Related Stories

टी-20 मध्ये 600 बळी मिळविणारा ब्रॅव्हो पहिला गोलंदाज

Patil_p

महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज पाटील-विशाल बनकर लढणार

datta jadhav

महिला टी-20 : न्यूझीलंडची भारतावर मात

Patil_p

आयसीसी पुरस्कारासाठी पंत, रुट, स्टर्लिंगला नामांकन

Patil_p

डिंग्को सिंगला बॉक्सर्सकडून मदतीचा हात

Patil_p

विनोद कुमारचा निकाल रोखला

Patil_p
error: Content is protected !!