Tarun Bharat

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत आज ‘फायनल’

Advertisements

चहल-हर्षलच्या फॉर्मवर फोकस, दोन्ही संघ निकराने लढणार

हैदराबाद / वृत्तसंस्था

भारतीय संघ आज (रविवार दि. 25) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात लढणार असून 3 सामन्यांची ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघात निकराचा लढा अपेक्षित आहे. भारतीय संघाचे हर्षल पटेल व यजुवेंद्र चहलच्या कामगिरीवर फोकस असेल. ही लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे.

यापूर्वी, नागपुरातील 8 षटकांच्या लढतीत दमदार विजय मिळवत भारताने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, हर्षल पटेल व यजुवेंद्र चहल या गोलंदाजांना सूर सापडणे भारतासाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. मागील सामन्यात अक्षर पटेलने 2 बळी घेत भेदक मारा साकारला. पण, अन्य गोलंदाज झगडत आहेत. भुवनेश्वरची डेथ ओव्हर्समधील हाराकिरी निराशाजनक ठरली असून साहजिकच, बुमराहची जबाबदारी वाढली आहे.

मधल्या षटकात भारतीय संघ फिरकीपटूंवर अधिक अवलंबून असतो. या धर्तीवर अक्षर पटेलचा फॉर्म लक्षवेधी आहे. चहलचा निष्प्रभ मारा मात्र चिंतेचे कारण ठरला आहे. स्पीडस्टार बुमराहने आपला व्हिन्टेज फॉर्म दाखवून दिला, ही मागील लढतीतील सकारात्मक बाजू ठरली.

फलंदाजीत रोहित, केएल राहुल व विराट कोहली या त्रिकुटाला आणखी सातत्यावर भर द्यावा लागेल. सूर्यकुमार यादव काही सामन्यात चमकला असून हार्दिक पंडय़ाने काही मॅचविनिंग डाव साकारले आहेत. मागील सामन्यात परफेक्ट फिनिशर ठरलेला दिनेश कार्तिक येथे पुन्हा एकदा अव्वल कामगिरी साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रित बुमराह, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍस्टॉन ऍगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन इलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झाम्पा.

सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

Related Stories

भारताचे इंग्लंडला 368 धावांचे आव्हान

Patil_p

साबरीकडे पहिले डब्ल्यूबीसी जेतेपद

Patil_p

फॉगनिनीही कोरोनाबाधित

Patil_p

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Patil_p

शेष भारत संघाचे नेतृत्व हनुमा विहारीकडे

Patil_p

कतार फिफा फुटबॉल वर्ल्डकपसाठी अर्जेन्टिनाचे तिकीट निश्चित

Patil_p
error: Content is protected !!