Tarun Bharat

फ्रान्सला नमवून भारत उपांत्यफेरीत

वृत्तसंस्था/ जेरुसलेम

फिडेच्या विश्व सांघिक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सचा 2.5-1.5 अशा गुणांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.

या लढतीत उभयतांमधील झालेल्या दोन सेट्समधील सामन्यानंतर भारताने फ्रान्सवर 3-1 अशी आघाडी घेतली होती. दरम्यान भारतीय बुद्धिबळ संघाने ब्लिझ प्रकारातील टायब्रेकर लढतीत फ्रान्सचा 2.5-1.5 असा पराभव करत स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. या लढतीत भारताच्या निहाल सरीन आणि एस. एल. नारायणन यांनी अनुक्रमे फ्रान्सच्या ज्युलेस मोसार्द आणि लॉरेन प्रेसिनेट यांच्यावर विजय मिळविले. गुरुवारी झालेल्या या लढतीत भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विदित गुजरातीने फ्रान्सचा टॉप सीडेड लेग्रेव्हला 45 व्या चालीत बरोबरीत रोखले. तर दुसऱया एका पटावरील सामन्यात फ्रान्सच्या मॅक्झिमे लेगार्देने भारताच्या अनुभवी ग्रँडमास्टर के. शशिकिरणचा 55 व्या चालीत पराभव केला. त्यानंतर भारताच्या सरीन आणि नारायणन यांनी विजय नोंदवित फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारत आणि उझ्बेकिस्तान यांच्यात उपांत्यफेरीची लढत होणार आहे.

या स्पर्धेतील दुसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उझ्बेकने युपेनचा 2.5-1.5 अशा गुणांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. स्पेन आणि अझरबैजान यांच्यातील लढतीत चार पटावरील विविध डाव 2-2 असे बरोबरीत राहिले. त्यानंतर टायब्रेकरमध्ये स्पेनने अझरबैजानवर 2.5-1.5 अशा गुणांनी मात करत उपांत्यफेरी गाठली. स्पेन आणि चीन यांच्यात उपांत्यफेरीची लढत होणार आहे. चीनने पोलंडचा पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले.

Related Stories

भनवाला, सांगवान यांना कांस्यपदक

Patil_p

विंडीजच्या विजयात ब्रुक्स, पोलार्ड यांची चमक

Patil_p

द. आफ्रिकेचा पाकिस्तानविरुद्ध निसटता विजय

Patil_p

भारत-बांगलादेश दुसरी कसाटी आजपासून

Patil_p

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व

Patil_p

अफगाण क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी जोनाथन ट्रॉट

Patil_p