वृत्तसंस्था/ कोलकाता
एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरी मोहिमेला भारतीय फुटबॉल संघ येथे बुधवारपासून प्रारंभ करीत आहे. यजमान भारत आणि कंबोडिया यांच्यातील तिसऱया फेरीतील सामना बुधवारी सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.
स्टीमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाला या सामन्यात कंबोडियाच्या तुलनेत विजयाची अधिक संधी आहे. फिफाच्या मानांकनात कंबोडियापेक्षा भारत वरच्या स्थानावर आहे. कंबोडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना घरच्या मैदानावर 1954 साली मलायाविरूद्ध खेळला होता. या सामन्यात मलायाने कंबोडियाचा 9-2 असा पराभव केला होता. फिफाच्या मानांकनात कंबोडिया सध्या 171 व्या स्थानावर आहे. 2006 साली कंबोडियाने पहिल्यांदा एएफसी चॅलेंज चषक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. तसेच त्यांनी सातवेळा एएफएफ फुटबॉल चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भाग घेतला होता.