नवी दिल्ली
भारत आणि गल्फ को ऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) यांनी दोन्ही क्षेत्रांमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) पुढे नेण्यासाठी सहमती दर्शवली असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणले, की जीसीसी या संदर्भात बोलणी सुरु आहेत.
आम्ही जीसीसी आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी पुढे नेण्यासाठी आणि पुन्हा सुरु करण्यास शक्य तेवढा लवकर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न असल्याचे जीसीसीचे सरचिटणीस नायफ फलाह एम अल-हजराफ यांच्यासोबत परिषदेत गोयल यांनी नमूद केले आहे.
काय आहे जीसीसी ?
जीसीसी ही आखाती प्रदेशातील सहा देशांची संघटना आहे. यामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अमिरातील, कतार, कुवेत, ओमान व बहरीन यांचा समावेश आहे. यासह परिषद म्हणजे भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक गट असल्याचेही स्पष्ट केले आहे.