Tarun Bharat

हिमाचल मधील हा स्वर्ग तुम्ही अनुभवला आहे काय..

ऑनलाईन टीम तरुण भारत :


मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे दरवर्षी लाखो लोक भेट देतात. हिमाचल मधील कुल्लू खोऱ्याच्या उत्तरेस असणारे हे पर्यटनस्थळ जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते.

Advertisements

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २०५० मीटर उंचीवर असून मनाली बियास नदीच्या काठावर वसलेले आहे. ब्रिटिश काळापासून हे ठिकाण नावारूपाला आले. ब्रिटिशांनी हिल स्टेशन म्हणून याचा उपयोग केला. उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी हजारो पर्यटक या हिल स्टेशनवर येतात.

हिवाळ्यात येथील तापमान ० अंशांच्या खाली पोहोचते. येथे अनेक सुंदर, नैसर्गिक ठिकाणे आहेतच सोबत हायकिंग, पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, ट्रेकिंग, कयाकिंग यांसारख्या खेळांचाही आनंद आपल्याला घेता येतो. रानफुले आणि सफरचंदाच्या बागा पाहून मन एकदम ताजेतवाने होऊन जाते. तर नक्की भेट द्या हिमाचल मधील या स्वर्गाला.

Related Stories

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीवर नागपुरात गुन्हा

prashant_c

मोरांच्या गावात गावकरी झाले पाहुणे ! कोठे ते चला पाहूया…

Abhijeet Shinde

अकोल्यातील जिनिंगला आग, 2 कोटींचे नुकसान

datta jadhav

महाराष्ट्रात ‘एक देश एक बाजार’ योजना लागू

Rohan_P

शाही हाउसबोटचे अस्तित्व संकटात

Amit Kulkarni

अनिल अंबानी विकणार वीज कंपन्यांमधील हिस्सा

datta jadhav
error: Content is protected !!