Tarun Bharat

23 टक्के योगदानासह भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक- पियुष गोयल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे आणि एकूण उत्पादनात भारताचे योगदान 23 टक्के असल्याची माहिती  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले आहे.   गोयल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तरे देत होते. ते म्हणाले की 2021 मध्ये भारतात 8.32 लाख कोटी रुपयांचे 1,984 लाख टन दुधाचे उत्पादन झाले.

दुधाच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीबाबत गोयल म्हणाले की, सहकारी आणि खाजगी डेअरी त्यांच्या उत्पादन खर्चावर आणि बाजारातील शक्तींच्या आधारावर त्याचे दर ठरवत असतात. सरकार नियमितपणे देशातील दुधाच्या स्थितीचे पुनरावलोकन आणि निरीक्षण करते परंतु देशातील दुधाची खरेदी आणि विक्री किंमत नियंत्रित करत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत. 

आगामी काळात पोषण मोहीम

सरकारकडून येत्या काळात पोषण मोहीम राबविण्यासाठी सरकार सहा वर्षांखालील मुले, किशोरवयीन मुली, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या पोषणाची स्थिती सुधारेल. व त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने योजना आखणार असल्याचेही यावेळी गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

सेन्सेक्सचा झंझावती प्रवास…

Patil_p

मेड इन इंडिया ‘रँगलर’ बाजारात दाखल

Amit Kulkarni

बजाज फिनसर्व्हचा नफा 44 टक्के वाढला

Patil_p

विमाधारकांना 31 मेपर्यंत हप्ते जमा करण्यास सवलत

Patil_p

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल स्थानी

Amit Kulkarni

बोटची उत्पादने मिळणार मिनीटात

Patil_p