केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने सोमवारी संसदेत सांगितले की, देशातील पोलाद उत्पादन वार्षिक 12 कोटी टनांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे आणि भारत जगातील दुसरे सर्वात मोठे स्टील उत्पादक झाला आहे. पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
‘गेल्या आठ वर्षांत देशातील स्टील उत्पादन दुप्पट झाले आहे आणि हे ऐतिहासिक आहे आणि त्यामुळेच आपण जगातील दुसऱया क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश ठरलो आहोत.’ 2030 पर्यंत स्टीलचे उत्पादन वार्षिक 300 दशलक्ष टनांपर्यंत करण्याचा भारताचा मानस असल्याचे सिंधिया म्हणाले.
2013-14 मध्ये देशातील पोलाद उत्पादन सुमारे सहा कोटी टन होते, जे आता 12 कोटी टन झाले आहे. ते म्हणाले की, भारत पोलाद उत्पादनात वृद्धीrच्या मार्गावर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि देशात मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत आमचे स्टील उत्पादन 15 कोटींवरून 30 कोटी टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.