वृत्तसंस्था/ डोहा
भारत आणि जॉर्डन यांच्यातील सरावाचा शेवटचा फुटबॉल सामना येथे शनिवारी होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.30 वाजता प्रारंभ होईल. 2023 साली चीनमध्ये होणाऱया एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेपूर्वीचा हा भारताचा शेवटचा सरावाचा सामना आहे.
चीनमध्ये पुढीलवर्षी होणाऱया एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र फेरीची फुटबॉल स्पर्धा कोलकाता येथे 8 जूनपासून सुरू होणार आहे. शनिवारच्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघातील अनेक नवोदितांची बलाढय़ जॉर्डनविरूद्ध सत्वपरीक्षा होईल. गेल्या महिनाभराच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाचे सराव शिबीर बेळ्ळारी आणि कोलकाता येथे घेण्यात आले होते. फिफाच्या मानांकनात भारत सध्या 106 व्या स्थानावर असून जॉर्डन 91 व्या स्थानावर आहे.