दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी वनडे मानांकनाच्या ताज्या यादीत भारताने पाकिस्तानला पिछाडीवर टाकत तिसऱया स्थानी झेप घेतली. ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत दणकेबाज विजय संपादन केल्यानंतर दोनच दिवसांनी जाहीर झालेल्या मानांकनात याचे प्रतिबिंब उमटले.
भारतीय संघ मागील वनडे मानांकन यादीत 105 गुणांसह चौथ्या स्थानी होता. मात्र, मंगळवारी 10 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर भारताने 108 गुणांवर झेप घेताना पाकिस्तानला मागे टाकले. पाकिस्तानच्या खात्यावर सध्या 106 गुण आहेत.
या सांघिक गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 127 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान असून इंग्लंडचा संघ 122 गुणांसह दुसऱया स्थानी राहिला आहे. मागील महिन्यात पाकिस्तानने विंडीजविरुद्ध क्लीन स्वीप मिळवल्यानंतर मानांकनात झेप घेतली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर याचाही त्यांना लाभ झाला. मात्र, त्यांचे तिसरे स्थान अल्पकालीन ठरले.
भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आणखी दोन वनडे खेळणार असून त्यात लक्षवेधी कामगिरी केल्यास संघाला याचा लाभ होऊ शकेल. त्यानंतर भारत या महिन्याच्या उत्तरार्धात विंडीजविरुद्धही वनडे मालिका खेळणार आहे.
तूर्तास, भारताने पाकिस्तानला पिछाडीवर टाकत तिसरे स्थान मिळवले असले तरी इंग्लंडविरुद्ध उर्वरित दोन सामने गमवावे लागल्यास मानांकनातील लाईनअप मागील क्रमवारीप्रमाणेच राहू शकते. पाकिस्तानची पुढील वनडे मालिका नेदरलँड्सविरुद्ध ऑगस्टमध्ये होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ त्यावेळी 5 दिवसांमध्ये 3 वनडे खेळेल.
आयसीसी कसोटी मानांकन
क्रमवारी / संघ / सामने / गुण / रेटिंग
1 / ऑस्ट्रेलिया / 22 / 2703 / 123
2 / भारत / 29 / 3318 / 114
3 / द. आफ्रिका / 21 / 2306 / 110
4 / इंग्लंड / 39 / 3909 / 100
5 / न्यूझीलंड / 27 / 2704 / 100
6 / पाकिस्तान / 20 / 1865 / 93
7 / श्रीलंका / 23 / 2003 / 87
8 / विंडीज / 25 / 1988 / 80
9 / बांगलादेश / 22 / 1047 / 48
10 / झिम्बाब्वे / 6 / 148 / 25.
आयसीसी वनडे मानांकन
क्रमवारी / संघ / सामने / गुण / रेटिंग
1 / न्यूझीलंड / 14 / 1776 / 127
2 / इंग्लंड / 23 / 2811 / 122
3 / भारत / 23 / 2479 / 108
4 / पाकिस्तान / 19 / 2005 / 106
5 / ऑस्ट्रेलिया / 23 / 2325 / 101
6 / द. आफ्रिका / 19 / 1872 / 99
7 / बांगलादेश / 25 / 2397 / 96
8 / श्रीलंका / 29 / 2658 / 92
9 / विंडीज / 33 / 2351 / 71
10 / अफगाण / 16 / 1071 / 67
आयसीसी टी-20 संघ
क्रमवारी / संघ / सामने / गुण / रँकिंग
1 / भारत / 39 / 10514 / 270
2 / इंग्लंड / 31 / 8192 / 264
3 / पाकिस्तान / 30 / 7826 / 261
4 / द. आफ्रिका / 29 / 7407 / 255
5 / ऑस्ट्रेलिया / 36 / 9009 / 250
6 / न्यूझीलंड / 28 / 6996 / 250
7 / विंडीज / 38 / 9188 / 242
8 / श्रीलंका / 36 / 8310 / 231
9 / बांगलादेश / 35 / 8061 / 230
10 / अफगाण / 17 / 3882 / 228