Tarun Bharat

इंडिया लिजेंड्स अंतिम फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/रायपूर

2022 रोड सेफ्टी विश्व सिरिज टी-20 लिजेंड्स क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात इंडिया लिजेंड्सने ऑस्ट्रेलिया लिजेंड्सचा 4 चेंडू बाकी ठेवून 5 गडय़ांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. इंडिया लिजेंड्स संघातील सलामीचा फलंदाज नमन ओझाने नाबाद अर्धशतक नोंदवून सामनावीर पुरस्कार मिळविला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया लिजेंड्सने 20 षटकात 5 बाद 171 धावा जमवित इंडिया लिजेंड्सला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर इंडिया लिजेंड्सने 19.2 षटकात 5 बाद 175 धावा जमवित विजय नोंदविला.

ऑस्ट्रेलिया लिजेंड्सच्या डावामध्ये कर्णधार शेन वॅटसनने 21 चेंडूत 6 चौकारांसह 30, ऍलेक्स डुलेनने 31 चेंडूत 5 चौकारांसह 35, बेन डंकने 26 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 46, फर्ग्युसनने 2 चौकारांसह 10, कॅमेरून व्हाईटने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 30 तर ब्रॅड हॅडिनने 8 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया लिजेंड्सच्या डावामध्ये 5 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. वॅटसन आणि डुलेन या सलामीच्या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. इंडिया लिजेंड्सतर्फे ए. मिथुन आणि युसुफ पठाण यांनी प्रत्येकी 2 तर राहुल शर्माने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडिया लिजेंड्सच्या डावामध्ये सलामीच्या नमन ओझाने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 62 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 90 धावा झळकविल्या. कर्णधार सचिन तेंडुलकरने 2 चौकारांसह 10, सुरेश रैनाने 11, युवराज सिंगने 18, इरफान पठाणने 12 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 37 धावा फटकावल्या.

Related Stories

फर्नांडेझ, साबालेन्का, मेदवेदेव्ह, फेलिक्स उपांत्य फेरीत

Patil_p

मनु भाकर राष्ट्रीय नेमबाज विजेती

Patil_p

ऑस्ट्रेलियन ओपनमधून डॉमिनिक थिएमची माघार

Patil_p

आनंद-गिरी सहावी लढत बरोबरीत

Patil_p

अडीच कोटीचा फायदा, साडेसहा कोटींचा तोटा!

Patil_p

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डीन जोन्स यांचे मुंबईत निधन

Tousif Mujawar
error: Content is protected !!