Tarun Bharat

इंडिया लिजेंड्स संघाचे सलग दुसरे जेतेपद

Advertisements

वृत्तसंस्था/ रायपूर (छत्तीसगड)

रोड सेफ्टी विश्व सिरीज लिजेंड्स टी-20 क्रिकेट स्पर्धेचे सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्स संघाने सलग दुसऱयांदा अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सने लंका लिजेंडस्चा 33 धावांनी पराभव करून विजेतेपद हस्तगत केले. इंडिया लिजेंड्स संघातील नमन ओझाने दमदार नाबाद शतक तसेच विनयकुमार आणि अभिमन्यू मिथून यांची भेदक गोलंदाजी ही वैशिष्टय़े ठरली. शतकवीर नमन ओझाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंडस्ने 20 षटकात 6 बाद 195 धावा जमवित लंका लिजेंडस्ला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले. पण इंडिया लिजेंडस्च्या अचूक गोलंदाजीसमोर लंका लिजेंडस्चा डाव 18.5 षटकात 162 धावात आटोपल्याने इंडिया लिजेंडस्ने हा सामना 33 धावांनी जिंकून सलग दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकली.

इंडिया लिजेंडस्ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकन लिजेंडस् संघातील वेगवान गोलंदाज नुवान कुलशेखराने कर्णधार सचिन तेंडुलकरला खाते उघडण्यापूर्वी तर त्यानंतर सुरेश रैनाला बाद केले. इंडिया लिजेंडस्ची स्थिती यावेळी 2 बाद 19 अशी होती. नमन ओझा आणि विनयकुमार यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 90 धावांची भागीदारी केली. विनयकुमारने 21 चेंडूत 36 धावा जमविल्या. जयरत्नेने विनयकुमारला बाद केले. 11.3 षटकात इंडिया लिजेंडस्ने 3 बाद 109 धावा जमविल्या होत्या. युवराज सिंगने 13 चेंडूत 19 धावा जमविल्या. इरफान पठाण 11, तर युसुफ पठाण शून्यावर बाद झाले. उदानाने हे दोन गडी बाद केले. नमन ओझाने 71 चेंडूत नाबाद 108 धावा तर बिन्नीने नाबाद 8 धावा जमविल्या. लंकन लिजेंडस्तर्फे कुलशेखराने 29 धावांत 3, उदानाने 34 धावात 2 तसेच जयरत्नेने एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंका लिजेंडस्च्या डावामध्ये विनयकुमार तसेच फिरकी गोलंदाज राजेश पोवार आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी लंकेची आघाडीची फळी झटपट बाद केली. दिलशान मुनवेराने 8, सनथ जयसुर्याने 5, कर्णधार तिलकरत्ने दिलशानने 11 आणि थरंगाने 10 धावा जमविल्या. लंकन लिजेंडस्ची स्थिती यावेळी 4 बाद 41 अशी होती. गुणरत्नेने आणि जीवन मेंडीस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. युसुफ पठाणने गुणरत्नेला बाद केले. त्याने 17 चेंडूत 19 धावा जमविल्या. जीवन मेंडीस चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 11 चेंडूत 20 धावा जमविल्या. लंकन लिजेंडस्चा निम्मा संघ 85 धावात तंबूत परतला. इशान जयरत्ने आणि महिला उदावते या जोडीने 63 धावांची भागीदारी सहाव्या गडय़ासाठी केल्याने लंकन लिजेंडस्ला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. मिथूनने उदावतेला बाद केले. त्याने 19 चेंडूत 26 धावा जमविल्या. लंकन संघाची स्थिती यावेळी 7 बाद 148 अशी होती. त्यांना विजयासाठी शेवटच्या 16 चेंडूत 48 धावांची जरुरी होती. जयरत्नेने समयोचित फलंदाजी करत 4 षटकार आणि 4 चौकारासह 22 चेंडूत 51 धावा झळकविल्या. विनयकुमारने जयरत्नेला पायचित केले. धमिका प्रसादला आपले खाते उघडता आले नाही आणि लंकन लिजेंडस्चा डाव 18.5 षटकात 162 धावात आटोपला. इंडिया लिजेंडस्तर्फे विनयकुमारने 3 तर मिथूनने 2, राजेश पवार, बिनी, युसुफ पठाण आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः इंडिया लिजेंड्स 20 षटकात 6 बाद 195 (नमन ओझा नाबाद 108, विनयकुमार 36, युवराज सिंग 19, बिन्नी नाबाद 8, कुलशेखरा 3-29, उदाना 2-34, जयरत्ने 1-44), लंका लिजेंडस् 18.5 षटकात सर्व बाद 162 (जयरत्ने 51, दिलशान 11, थरंगा 10, मेंडीस 20, उदावते 26, विनयकुमार 3-38, मिथून 2-27).

Related Stories

बार्सिलोनाच्या फुटबॉलपटूला दुखापत

Patil_p

वनडे मानांकनात मिताली दुसऱया तर मानधना आठव्या स्थानी

Patil_p

जेव्हा लाईव्ह टीव्हीवर प्रशिक्षक तिला प्रपोज करतो!

Patil_p

हार्दिक, क्रुणाल पांड्याच्या वडिलांचे निधन

datta jadhav

वर्ल्डकप भारताबाहेर आयोजित करण्याची मागणी करणार – मणी

Patil_p

खेळाडूंच्या हॉटेलपासून अवघ्या 30 किलोमीटर्स अंतरावर विमान कोसळले!

Patil_p
error: Content is protected !!