Tarun Bharat

भारत-मलेशिया महिला क्रिकेट सामना आज

Advertisements

वृत्तसंस्था/ सिलेत

महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना सोमवारी येथे खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना लंकेचा पराभव केला होता. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता प्रारंभ होईल. या सामन्यात शफालीच्या कामगिरीवर लक्ष असेल.

सोमवारी होणाऱया सामन्यात मलेशियन संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ निश्चितच करणार नाही, अशी प्रतिक्रिया शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रित कौरने व्यक्त केली आहे. मलेशिया महिला संघाला या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने 9 गडय़ांनी पराभूत केले होते. लंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघातील फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज हिची फलंदाजी दमदार झाली होती. पुढील वर्षीच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेत होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आतापासूनच जोरदार सराव करीत आहे. गेल्या वर्षीच्या मार्चनंतर शफाली वर्मा फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. गेल्या मार्चमध्ये तिने टी-20 या प्रकारात अर्धशतक झळकविले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने दोन सामन्यात बऱयापैकी धावा जमविल्या होत्या. मात्र शफाली वर्माला इंग्लंडच्या दौऱयात धावा जमविता आल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत सलामीची फलंदाज शफाली वर्मा कामगिरीत सातत्य राखण्यासाठी झगडत आहे.

आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील लंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मंदाना लवकर बाद झाली होती. पण त्यानंतर मनगटाची दुखापत होऊ नये. रॉड्रीग्युजने आपल्या दमदार फलंदाजाच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. सोमवारी होणाऱया सामन्यात भारताच्या अंतिम 11 खेळाडूमध्ये कदाचित नवोदित किरण नेवगिरेला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रेणुका सिंग ठाकुर, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकर, आणि हेमलता यांच्यावर राहिल.

भारतीय संघ- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, एस. मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, डी. हेमलता, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकुर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि नवगिरे.

Related Stories

कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

datta jadhav

विद्यमान जेत्या इलेन थॉम्पसनसमोर अनेक आव्हाने

Patil_p

जर्मनीची ज्युलिया जॉर्जेस टेनिसमधून निवृत्त

Patil_p

निखत झरीन, गौरव सोळंकी उपांत्य फेरीत

Patil_p

चिलीचा सांचेझ जखमी

Patil_p

कोन्टाची दोन स्पर्धांतून माघार

Patil_p
error: Content is protected !!