Tarun Bharat

भारत-मालदिव फुटबॉल सामना बुधवारी

Advertisements

वृत्तसंस्था/ अल खोबर (सौदी अरेबिया)

17 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या एएफसी आशिया चषक 2023 च्या पात्र फेरी फुटबॉल मोहिमेला भारताचा संघ सज्ज झाला आहे. ड गटातील भारत आणि मालदिव यांच्यातील पहिला सामना येथे बुधवार 4 ऑक्टोबर रोजी खेळविला जाणार आहे.

एएफसी 17 वर्षाखालील वयोगटाच्या 2023 च्या आशिया चषक पात्र फेरी स्पर्धेला यापूर्वीच येथे प्रारंभ झाला आहे. ड गटातील झालेल्या एका सामन्यात कुवेतने मालदिवचा 6-0 अशा गोलफरकाने पराभव केला तर दुसऱया एका ड गटातील सामन्यात यजमान सौदी अरेबियाने म्यानमारचे आव्हान 6-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. मालदिव संघाने या पात्र फेरीच्या स्पर्धेतील आपला पहिला सामना गमविला असला तरी भारतीय संघाला बुधवारी होणाऱया या सामन्यात मालदिवपासून अधिक जागरुक राहावे लागेल. श्रीलंकेमध्ये झालेल्या सॅफ 17 वर्षाखालील वयोगटाच्या फुटबॉल स्पर्धेत भारताने मालदिवचा मोठय़ा फरकाने पराभव केला होता. 2023 साली होणाऱया 17 वर्षाखालील वयोगटाच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र फेरीच्या स्पर्धेत एकूण 43 संघांचा समावेश असून ते संघ 10 गटात विभागण्यात आले आहेत. या दहा गटातील विजेते संघ आशिया चषक 2023 च्या स्पर्धेसाठी निश्चित पात्र ठरतील. तसेच दुसऱया क्रमांकावरील सहा संघ प्रमुख स्पर्धेत दाखल होतील.

Related Stories

कुस्तीची कोंडी फुटेल?

datta jadhav

महिला विश्वचषक हॉकीसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

आयपीएलमधील भारतीय कर्णधारांचे यश राष्ट्रीय संघासाठी सुचिन्ह

Patil_p

नेसरबरोबरचा सरेचा करार रद्द

Patil_p

आयपीएलचा कालावधी कमी होईल : गांगुली यांचे संकेत

tarunbharat

महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Tousif Mujawar
error: Content is protected !!