Tarun Bharat

भारताचे सामने म्यानमार, किर्गीज प्रजासत्ताकबरोबर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

17 वर्षांखालील वयोगटाच्या एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारतीय महिला फुटबॉल संघाचे सामने म्यानमार आणि किर्गीज प्रजासत्ताक संघाबरोबर होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताचा ‘फ’ गटात समावेश आहे.

गुरुवारी या स्पर्धेचा ड्रॉ कौलालंपूर येथे काढण्यात आला. ‘फ’ गटात भारत, म्यानमार आणि यजमान किर्गीज प्रजासत्ताक यांचा समावेश आहे. एएफसी 17 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक पात्रतेच्या राऊंड-1 स्पर्धेत एकूण 29 संघांचा समावेश असून हे संघ आठ गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचा संघ राऊंड-2 साठी पात्र ठरेल. राऊंड-2 मध्ये दोन गट पाडले असून प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ तसेच 2019 साली थायलंडमध्ये झालेल्या एएफसी 16 वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेतील विद्यमान विजेते जपान, कोरिया प्रजासत्ताक, चीन आणि इंडोनेशिया हे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे.

गट- ‘अ’ मध्ये मलेशिया, नॉर्दर्न मॅरिना आयलंड्स, इंडोनेशिया, ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, चीन तैपेई, मंगोलिया, भुतान, ‘क’ गटात व्हिएतनाम, उझबेकिस्तान, पॅलेस्टिन, बहरीन आणि बांगलादेश, ‘ड’ गटात यजमान सिंगापूर (मलेशिया), संयुक्त अरब अमिरात, तुर्केमेनिस्तान, ‘ई’ गटात कोरिया प्रजासत्ताक, हाँगकाँग, यजमान ताजिकिस्तान आणि इराक, ‘फ’ गटात म्यानमार, भारत, यजमान किर्गीज प्रजासत्ताक, ‘ग’ गटात फिलिपाईन्स, लेबनॉन, गुआम, तर ‘च’ गटात इराण, जॉर्डन व नेपाळ यांचा समावेश आहे. या स्पर्धेत पात्र राऊंड-1 मधील सामने 22 ते 30 एप्रिल-2023 दरम्यान त्याचप्रमाणे राऊंड-2 मधील सामने 16 ते 24 सप्टेंबर-2023 तसेच अंतिम स्पर्धा 7 ते 20 एप्रिल-2024 दरम्यान आयोजित केली आहे.

Related Stories

प्रेक्षकविना स्टेडियममध्ये क्रिकेट सामने खेळवावेत : स्टोक्स

Patil_p

भारतीय संघासाठी दोन आठवडय़ांचे क्वारंटाईन

Patil_p

आदित्य तरे आता उत्तराखंडकडून खेळणार

Patil_p

ब्रिटनची रॅडुकानू शेवटच्या आठ खेळाडूत

Patil_p

अमेरिकन गोलंदाज अली खान अबु धाबीत दाखल

Patil_p

आयर्लंड-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिका जुलैमध्ये

Patil_p