वृत्तसंस्था /ऑकलंड
हंगामी कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारत आणि यजमान न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी येथे खेळविला जात आहे. सदर मालिका तीन सामन्यांची असून भारताने न्यूझीलंडच्या भूमीवर अलीकडेच तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली असल्याने भारतीय संघ या वनडे मालिकेत पुन्हा नव्या जोमाने मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सदर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.
पुढील वषी भारतामध्ये आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी आतापासूनच पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर 2020 साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला यजमान न्यूझीलंडकडून 0-3 असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाची गोलंदाजी अत्यंत निकृष्ट झाली होती. भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आता केवळ अकरा महिने बाकी राहिले आहेत. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ परस्परावर मात करण्यासाठी आतुरलेले आहेत.
या वनडे मालिकेसाठी संघातील पाच ज्ये÷ खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, जसप्रित बुमराह आणि अव्वल अष्टपैलू रविंद्र जडेजा यांना संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली आहे. धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघामध्ये नवोदित शुबमन गिल, संजू सॅमसन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या दौऱयासाठी माजी कसोटीवीर व्ही.व्ही.एस. लक्ष्मणकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघाचा नियमित प्रमुख प्रशिक्षक राहुल दविडला या दौऱयासाठी विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन पुढील वषीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी 38 व्या वर्षाच्या समीप पोहोचणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत शिखर धवनने वनडे क्रिकेटमध्ये जवळपास एक हजार धावा जमविल्या आहेत. शिखर धवनने खेळलेल्या वनडे सामन्यांच्या तुलनेत कोहली आणि रोहित शर्मा यांची वनडे सामन्यांची संख्या खूपच कमी आहे. कोहली आणि रोहित शर्मा यांनी वनडे क्रिकेटपेक्षा कसोटी आणि टी-20 प्रकारावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशीप तसेच त्यानंतर 2024 ची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा असल्याने कोहली आणि शर्मा यांनी आतापासूनच आपल्या जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे. त्यांचे लक्ष्य या आगामी प्रमुख दोन स्पर्धांवर राहणार आहे.
भारत- शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, दीपक हुडा, शहाबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, दीपक चहर, अर्शदीप सिंग, शार्दुल ठाकुर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड- केन विल्यम्सन (कर्णधार), ऍलेन, कॉनवे, लॅथम, डॅरियल मिचेल, फिलिप्स, ब्रेसवेल, साऊदी, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, नीशम, मिचेल सँटनर, फर्ग्युसन.