वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनुई
यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना येथे रविवारी खेळविला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
रविवारच्या दुसऱया सामन्यावरही पावसाचे सावट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ नये यासाठी दोन्ही संघातील खेळाडू प्रार्थना करीत आहेत. हा सामना बे ओव्हल मैदानावर होणार असून सीमारेषांचे अंतर अधिक असल्याने खेळाडूंना फटके मारताना अधिक सावध रहावे लागेल. भारतीय संघातील 33 वषीय वेगवान खेळाडू भुवनेश्वर कुमारने या सामन्याबाबत आपली वैयक्तिक प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे, की संघ व्यवस्थापनाला परिस्थिती हाताळण्याची क्षमता आहे. 2024 साली होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळेल किंवा नाही याबाबत सध्या तरी सांगता येत नाही. भारतीय संघाचा हंगामी प्रशिक्षक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि कर्णधार हार्दिक पंडय़ा यांच्यावर या मालिकेसाठी अधिक दडपण राहील. 2022 च्या क्रिकेट हंगामात भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक म्हणजे 36 गडी बाद केले आहेत. भुवनेश्वर कुमारने हे बळी खेळपट्टी आणि परिस्थितीचा अंदाज घेत कमी ताकदीच्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध मिळविले आहेत. फलंदाजीस अनुकूल असलेल्या फ्लॅट खेळपट्टीवर भुवनेश्वर कुमारने हे यश मिळविले आहे. नव्या दमाच्या उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांची या सामन्यात चाचणी राहील. न्यूझीलंडच्या वेगवान खेळपट्टय़ांवर भारताचे हे नवे गोलंदाज न्यूझीलंडच्या ऍलेन, फिलिप्स आणि कॉन्वे यांच्यावर दडपण आणण्यात यशस्वी ठरतील, याचे उत्तर रविवारच्या सामन्यात मिळू शकेल. भारतीय संघाचे उपकर्णधारपद यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतकडे असले तरी रविवारच्या सामन्यात ऋषभ पंत किंवा शुभमन गिल यापैकी एकाला संधी देण्याची शक्मयता आहे. ऋषभ पंतच्या गैरहजेरीत कदाचित ईशान किसनची निवड शक्मय आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल न्यूझीलंडच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून कितपत रोखेल यावरच भारताचे या सामन्यातील यश अवलंबून राहील.